Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दोन पदवीधर व तीन शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर
महाराष्ट्र संवाद विशेष

दोन पदवीधर व तीन शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर

नाशिक पदवीधरमध्ये आमदार सुधीर तांबे यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार कोण याची उत्सुकता
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/12/2022Updated:30/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

पालिका, महापालिकेच्या निवडणुकीला मुहूर्त कधी लाभणार?

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

मुंबई : नाशिक, अमरावती या दोन पदवीधर मतदार संघासोबत औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने त्या संबंधीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली असली तरी बहुचर्चित ठरलेल्या पालिका आणि महापालिकेच्या निवडणुकीला अद्याप आयोगाला मुहूर्त सापडलेला नाही.

गेल्या तीन टर्मपासून आमदार डॉ. सुधीर तांबे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेत सक्षमपणे प्रतिनिधित्व करत आहे. दोन दिवसापूर्वीच त्यांची विधान परिषदेत काँग्रेसचे गटनेते म्हणून निवड झाली होती. तांबे यांच्यासह अमरावती पदवीधरमध्ये भाजपचे रणजीत पाटील, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे, कोकण शिक्षक मतदार संघामध्ये बाळाराम पाटील आणि नागपूरचे नागो गाणार हे दोन या अपक्ष आमदारांच्या मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षासाठी ही निवडणूक वर्चस्वाची व महत्त्वाची ठरणार आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे आणि युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे हे नाशिकमधून काँग्रेसचे आमदार आहेत. होऊ घातलेल्या निवडणुकीतही त्यांची उमेदवारी निश्चित असून काँग्रेससाठी ही जागा महत्त्वाची आहे. तर दोन वर्षांपूर्वी पदवीधर मतदार संघातून विजय मिळविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी औरंगाबादची जागा महत्त्वाची मानली जाते. औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे.

तर अमरावती मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने डॉ. रणजीत पाटील यांची उमेदवारी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच जाहीर केली आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षासाठी ही जागा प्रतिष्ठेची असेल. याशिवाय कोकण आणि नागपूरमध्ये अपक्ष उमेदवार प्रतिनिधित्व करत असल्याने याही जागांवर निवडणूक होत असून येथे कोणाची वर्णी लागणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

पदवीधर सह शिक्षक मतदार संघासाठी ५ जानेवारीला अधिसूचना निघणार असून १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. १३ जानेवारीला उमेदवारी अर्जाची छाननी होईल. १६ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. तर ३० जानेवारीला पाचही जागांसाठी एकाच वेळी मतदान होणार असून २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान निवडणुकीची घोषणा झाल्याने आचारसंहिता देखील लागू झाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 84
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – तालुक्यातील धांदरफळ पंचक्रोशीसह परिसरात मागील अनेक दिवसांपासून सुरू…

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.