Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नवीन कॉजवे पुलाच्या निर्मितीकरिता तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची पालकमंत्र्यांकडे ॲड. श्रीराम गणपुलेंची मागणी
सामाजिक

नवीन कॉजवे पुलाच्या निर्मितीकरिता तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची पालकमंत्र्यांकडे ॲड. श्रीराम गणपुलेंची मागणी

भूमिगत गटार योजनेच्या काही चुकीच्या कामामुळे साई मंदिराकडे जाणारा पूल खचला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : भूमिगत गटार योजनेच्या चुकीच्या पद्धतीने केल्या गेलेल्या कामामुळे स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर गंगामाई घाटाकडे जाणारा पूल खचल्याने गेल्या सहा महिन्यांपासून हा पूल वाहतुकीस बंद आहे. या पुलाची दुरुस्ती तातडीने होणे शक्य नसल्याने जवळच कमी उंचीचा कॉजवे पूल दुरुस्तीसाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करावा, अशी मागणी संगमनेर भाजपचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महसूल मंत्री विखे पाटील यांची भेट घेत गणपुले यांनी ही मागणी केली आहे. स्वामी समर्थ मंदिरालगत असलेला हा पूल तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी नाबार्ड अर्थसहाय्य योजनेतून मिळविलेल्या निधीतून या पुलाची उभारणी करण्यात आली होती. सुस्थितीत असलेल्या या पूलाचे तीन गाळे खचल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. स्वामी समर्थ मंदिरालगतच्या या पुलावरून साईबाबा मंदिर, गंगामाई घाट, साईनगर, पंपिंग स्टेशन या उपनगरातील रहिवाशांना ये-जा करता येत होती. शिवाय या परिसरात पुलापलीकडे शाळा, कनिष्ठ महाविद्यालय असून पूल बंद असल्याने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठी गैरसोय झाली आहे. या परिसरात असलेली मंदिरे वृक्षराजी यामुळे सकाळी व संध्याकाळी वृद्धांसह सर्व स्तरातील नागरिक फिरण्यासाठी, शुद्ध हवेसाठी येत होते. पूल बंद असल्याने या सर्वांची अडचण झाली.

परिसरातील जवळपास दहा हजार लोकसंख्येसाठी शहरात येण्याचा हा महत्त्वाचा मार्ग आहे. या पुलाखालून करण्यात आलेल्या भूमिगत गटार योजनेच्या चुकीच्या कामामुळे सुस्थितीत असलेला हा पूल खचला आहे. संगमनेर नगर परिषदेत सध्या प्रशासक राज सुरू आहे. कौन्सिल अस्तित्वात नसल्याने या पुलाच्या बांधकामासाठी कोणी प्रयत्नशील दिसत नाही. तसेच या पुलाच्या बांधकामासाठी निधीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर पूल तातडीने दुरुस्त होणे शक्य नसल्याची चिन्हे आहेत.

त्यामुळे तेवढयाच वेळात पर्यायी कमी उंचीचा कॉजवे पुल हा चव्हाणपुरा ते घोडेकर मळा, वेताळ बाबाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधला तर तो लवकर पूर्ण होऊन अडचण दुर होणार आहे. 

यासंदर्भात आपल्याशी झालेल्या चर्चेनंतर या पुलाच्या निर्मितीसाठी दोन कोटी आठ लाख चाळीस हजार रुपयांचे अपेक्षित अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केले आहे. यासाठी तातडीने निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे या पुलाच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पालकमंत्री या नात्याने लक्ष घालण्याची मागणी गणपुले यांनी केली आहे.

याकरिता आवश्यक त्या योग्य योजनेतून निधी उपलब्ध करुन दिल्यास चालू वर्षातच सदर पुलाचे बांधकाम सुरु होऊन नागरिकांची गैरसोय दूर होऊ शकते असे या निवेदनात म्हटले आहे. पूल निर्मितीचे गाऱ्हाणे थेट महसूल मंत्र्यांच्या दरबारी गेल्याने महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील काय भूमिका घेतात, याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 154
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथे वीज बिल भरले नाही म्हणून रोहित्र…

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.