Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तीन बिबटे आणि चारशे कोंबड्या…
महाराष्ट्र संवाद विशेष

तीन बिबटे आणि चारशे कोंबड्या…

मध्यरात्री पोल्ट्री फार्ममध्ये धुमाकूळ घालत तीन बिबट्यांनी सुमारे ४०० कोंबड्यांचा पाडला फडशा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

अहमदनगर : शुक्रवारी मध्यरात्री तीन बिबट्यांनी एकत्रित पोल्ट्री फार्ममध्ये धुमाकूळ घालत सुमारे चारशेहून अधिक कोंबड्या फस्त केल्या तर अनेक कोंबड्या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत.

अकोले तालुक्यातील मेहेंदुरी येथील शेतकरी सुधीर दगडू बंगाळ यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये ही घटना घडली आहे. अनेक कोंबड्या भयभीत झाल्याने आणखी काही कोंबड्या दगावण्याची शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले तालुक्यातील मेहेंदुरी परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांचा या परिसरात नेहमीच वावर असतो. बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून हा भाग परिचित आहे. त्यामुळे या परिसरात अनेक बिबटे दिवस-रात्र संचार करीत आहेत. यातून मानवांवर हल्ल्याचे प्रकार देखील घडले आहेत.

शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या दरम्यान बंगाळ यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये एकाच वेळी तब्बल तीन बिबटे घुसले. या बिबट्यांनी मोठ्या प्रमाणात कोंबड्या असलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये धुमाकूळ घालत शेकडो कोंबड्यांना आपले भक्ष्य बनविले. यामध्ये अनेक कोंबड्यांना जखमी केले. बिबट्यांच्या या हल्ल्यात सुमारे ४०० कोंबड्या दगावल्या आहेत. दरम्यान पोल्ट्री फार्मचे मालक बंगाळ यांना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आपल्या फार्ममध्ये बिबटे घुसल्याची शंका आल्याने त्यांनी पोल्ट्री जवळ जाऊन पाहिले असता कोंबड्यांचा फारसा पाडलेले बिबटे त्यांना बघून पोल्ट्रीच्या कुंपणावरून उडी मारत जवळच्या उसाच्या शेतात गायब झाले.

शनिवारी सकाळी अकोले वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विठ्ठल पारधी यांनी घटनास्थळी जाऊन मृत आणि जखमी कोंबड्यांचा पंचनामा केला आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात बंगाळ यांचे सुमारे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या सर्व मृत कोंबड्या मोठा खड्डा खोदून गाडून टाकण्यात आल्या. अकोले तालुक्यात बिबट्यांचा मोठा उपद्रव वाढला असून वनविभागाने याठिकाणी पिंजरे लावून बिबटे जेरबंद करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थानी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 265
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.