महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
पुणे : शिक्षण झाल्यानंतर आपल्याकडे मराठी माणूस नोकरीला प्राधान्य देतो. व्यवसाय करण्याचे धाडस तो दाखवत नाही. असं मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित १८ व्या जागतिक मराठी संमेलनामध्ये ते बोलत होते. यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार, पी. डी. पाटील, संमेलनाध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे आधी व्यासपीठावर उपस्थित होते.
मराठी टक्का आणि मराठी माणसाविषयी चिंता व्यक्त करत पाटील म्हणाले, राजकारणात मराठी माणूस येण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. निवडणुकांमध्ये उमेदवारी देऊ नका, असं मराठी माणूस म्हणू लागला आहे. विश्लेषकांमध्ये देखील मराठी नाव फारसे सापडत नाही. यात अमराठी व्यक्ती अधिक संख्येने आहेत. मराठी माणसाची ही मानसिकता बदलायला हवे यासाठी पुढाकाराची गरज आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले,
मराठी भाषा जपली जावी की जगामध्ये श्रेष्ठ व्हावी यासाठी एक पोर्टल काढणार आहे. मराठीच्या एकेका शब्दात ऊर्जा आणि शक्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

