Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कोरोना काळात पोलीस निरीक्षकाच्या पायावर कार घातल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
न्यायालय

कोरोना काळात पोलीस निरीक्षकाच्या पायावर कार घातल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Close-up Of Male Judge In Front Of Mallet Holding Documents
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर ; कोरोना काळात जिल्हा बंदी असताना नासिकहून पुणे जिल्ह्यात जाणाऱ्या वाहनाची तपासणी करताना नाकाबंदी दरम्यान दंड आणि कारवाई चुकविण्याचे उद्देशाने पळून जाण्याच्या प्रयत्नात पोलीस निरीक्षकांच्या पायावर कार घालून त्यांच्या पायाला दुखापत करणाऱ्या आरोपीची संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी निर्दोष मुक्तता केली आहे.

न्यायाधीश डी. आर. देशपांडे यांनी अवघ्या ११ महिन्यात हा खटला निकाली काढला. १५ मे २०२१ रोजी संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथील आंबी फाट्यावर हा प्रकार घडला होता. कोरोना प्रादुर्भाव असल्याने नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींकडे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना पास आहेत की नाही याची पोलीस निरीक्षक सुनील पाटील तपासणी करत होते. यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील मारुती सुझुकी इर्टिगा कार नाशिकवरून पुण्याकडे नेत असताना पोलीस निरीक्षक पाटील यांनी ती तपासणीसाठी थांबविली. मात्र नाकाबंदी दरम्यान दंड आणि कारवाई चुकविण्याच्या उद्देशाने पळून जाण्याच्या प्रयत्नात आरोपीने कार पाटील यांच्या पायावर घातल्याने त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली. यामुळे पाटील यांनी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात दुखापत करणे व शासकीय कामात अडथळा केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत यांनी तपास करत आरोपीस अटक केली होती. तसेच आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. आरोपीने न्यायालयामध्ये गुन्हा नाकबूल करत केसमध्ये खोट्या रीतीने गोवल्याच सांगत खटला चालविण्याची विनंती केली. न्यायाधीश डी. आर. देशपांडे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू होती.

न्यायालयासमोर सरकार पक्षाला आरोपीविरुद्ध ठेवलेला कोणताही आरोप सिद्ध करता आला नाही. तसेच निरीक्षक पाटील यांनी न्यायालयासमोर नजरचुकीने गाडी बाजूला घेताना धक्का लागल्याचे कबूल केले. त्यामुळे आरोपीने शासकीय कामात अडथळा आणल्याचे शाबित करता आले नाही.

तसेच आरोपीची वाहतूक अत्यावश्यक सेवेत येत असल्याने त्याला संबंधित प्रतिबंधात्मक आदेशातून सूट असल्याचा केलेला बचाव न्यायालयाने मान्य करत आरोपीला संशयाचा फायदा देत गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले आहे. आरोपीच्या वतीने ॲड. अतुल आंधळे यांनी काम बघितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 347
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

चेक बाऊन्स प्रकरणी संगमनेर येथील सराफाला ६ महिने कारावास आणि साडेसहा लाखांच्या भरपाईचा आदेश

19/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.