Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून रस्त्यांसाठी 32 कोटी 36 लाख रुपयांचा निधी मंजूर
विकास

काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून रस्त्यांसाठी 32 कोटी 36 लाख रुपयांचा निधी मंजूर

मालदाड- चिंचोली गुरव रस्त्यासाठी 14 कोटी 75 लाख रुपये मंजूर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांकरता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 32 कोटी 36 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने सरकारमधून तालुक्यातील विविध विकास कामांसाठी मोठा निधी मिळवला आहे. या सततच्या विकास कामातून विस्ताराने मोठा असलेला संगमनेर तालुका विकासाचे मॉडेल ठरला आहे. प्रत्येक गावात पायाभूत सुविधा, रस्ते, सिमेंट बंधारे, शाळा, दवाखाने यांसह विविध वैभवशाली इमारती उभ्या राहिल्या आहेत.

याचबरोबर उत्तर नगरच्या जिल्ह्यासाठी वरदान ठरणारे निळवंडे धरणाचे काम पूर्ण करून कालव्यांच्या कामाला गती दिली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात रात्रंदिवस हे काम सुरू ठेवून ऑक्टोबर 2022 मध्येच पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवले. मात्र सरकार बदल झाला आणि अत्यंत वेगाने सुरू असलेली कामे थंडावली तरीही या कामांचा सातत्याने पाठपुरावा आ. बाळासाहेब थोरात हेच करत आहे

याचबरोबर पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून संगमनेर मतदार संघातील विविध रस्त्यांसाठी नव्याने 32 कोटी 36 लाख रुपयांचा निधी मिळवला आहे. या अंतर्गत तालुक्यातील उत्तर भागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा आशापीरबाबा-चिंचोली गुरव-नान्नज दुमाला-सोनोशी-बिरेवाडी-मालदाड या 20 किलोमीटर गाव रस्त्यासाठी 14 कोटी 45 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. तर संगमनेर नगरपालिका हद्द तिरंगा चौक घुलेवाडी ते मालदाड या 6 किलोमीटर गाव रस्त्यासाठी 4 कोटी 37 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग 60 ते गुंजाळवाडी-राजापूर-निमगाव भोजापूर-चिकनी वरपे वस्ती या 11 किलोमीटर रस्त्यासाठी 9 कोटी 17 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. तर रणखांबवाडी-दरेवाडी-कवठे मलकापूर या 6 किलोमीटर रस्त्यासाठी 4 कोटी 37 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. निधी मंजूरी पाठोपाठ लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 264
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्याला १०.५० कोटींचा निधी; दोन मोठ्या पुलांचे काम मार्गी – आमदार अमोल खताळ

18/12/2025

एमआयडीसीसाठी उपलब्ध जागेचा अहवाल सादर करण्याचे आदेश, आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश – पठारातील प्रस्तावित एमआयडीसीसाठी ‘गुड न्यूज’

18/12/2025

संगमनेरच्या केशवतीर्थाला आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून स्मार्ट टच! महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र ई-टॉयलेट्स आणि चेंजिंग रूम लवकरच

24/10/2025
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.