Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘राजा का बेटा राजा नही बनेगा जो…’, म्हणत शुभांगी पाटील यांनी ठाकरे गटाकडून फुंकले रणशिंग
राजकारण

‘राजा का बेटा राजा नही बनेगा जो…’, म्हणत शुभांगी पाटील यांनी ठाकरे गटाकडून फुंकले रणशिंग

ठाकरे गटाचे उमेदवारी मिळवत शुभांगी पाटलांनी निवडणुकीतील चुरस वाढविली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

मुंबई / नाशिक : ‘राजा का बेटा राजा नही बनेगा जो काबिल है वही राजा बनेगा’, असं म्हणत शुभांगी पाटील यांनी नासिक पदवीधर निवडणुकीत रणशिंग फुंकले आहेत. आधी भाजपकडून इच्छुक असलेल्या शुभांगी पाटील यांनी आता शिवसेनेकडून (ठाकरे गट) पाठिंबा मिळविण्यात यश मिळविले आहे. यामुळे सत्यजित तांबे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.

महाविकास आघाडीकडून नाशिकची जागा शिवसेनेला (ठाकरे गट) देण्यात आली आहे. यापूर्वी महाविकास आघाडीने नाशिक पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती मात्र डॉ. तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. उलट चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीत मोठा चमत्कार घडवून आणला होता.

डॉ. तांबे यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला नाही तसाच भारतीय जनता पक्षानेही या निवडणुकीत आपला उमेदवार उभा केला नाही. त्यामुळे सत्यजित तांबे यांची उमेदवारी बंडखोरी समजून ते भाजपचे उमेदवार असल्याचा प्रचार सुरू आहे.

सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीने या मतदारसंघात मोठा पेच निर्माण झाल्याने मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शुभांगी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपवासी झालेल्या पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल करत पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र पक्षाने त्यांनाही एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे निवडणुकीतील ट्विस्ट लक्षात घेत भाजपचा पाठिंबा तांबे यांना मिळणार हे गृहीत धरून पाटील यांनी मातोश्रीची वाट धरली.

दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील बंडखोर तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर केले आहे. असे असले तरी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. येत्या दोन दिवसात ते भूमिका स्पष्ट करण्याच चिन्ह असून तोपर्यंत पदवीधर निवडणुकीतील सस्पेन्स कायम राहणार आहे.

फडणवीस म्हणाले… योग्य वेळी योग्य गोष्टीचा खुलासा करू

सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्या उमेदवारी संदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले योग्य वेळी योग्य गोष्टींचा खुलासा करू. बघत रहा, परिस्थितीवर नजर ठेवा. योग्य वेळी योग्य गोष्टी आपल्याला समजतील.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 463
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar18/10/20260

मेष – आजच्या दिवशी मनाची द्विधावस्था राहील. संपूर्ण खात्री करूनच संमती द्या. नसती काळजी करत…

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.