Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चार शिक्षकांसह दोघा केंद्र प्रमुखांचे निलंबन; संगमनेरमधील दोघांचा समावेश
शिक्षण

चार शिक्षकांसह दोघा केंद्र प्रमुखांचे निलंबन; संगमनेरमधील दोघांचा समावेश

रमेश आहेर आणि प्रभाकर रोकडे यांचे सीईओंनी केले निलंबन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

अहमदनगर / संगमनेर : नगर जिल्ह्यातील चार शिक्षकांसह दोघा केंद्र प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात संगमनेर तालुक्यातील दोन शिक्षकांचा समावेश असून त्यांनी आपल्या जागेवर परस्पर डमी बेरोजगार शिक्षकांच्या नियुक्ती केल्याचे, तसेच कामात हलगर्जीपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी या सर्वांवर निलंबनाची कारवाई केली.

सीईओ येरेकर यांनी यासंबंधीचे आदेश मंगळवारी काढले आहेत. या शिक्षकांच्या धक्कादायक करामती यामुळे समोर आल्या आहेत.

यांच्यावर झाली कारवाई

उपाध्यापक रमेश शिवाजी आहेर (कारेवाडी, संगमनेर), प्रभाकर सखाराम रोकडे (जवळे बाळेश्वर संगमनेर), उपाध्यापक मदन रंगनाथ दिवे (राहुरी), पारनेरचे केंद्रप्रमुख अविनाश गुलाबराव गांगर्डे, उपाध्यापक बाजीराव शंकर पानमंद (जि.प. शाळा मांजरधाव, हिवरे कोरडा, पारनेर) व मुख्याध्यापक पोपट दगडू फाफाळे (पाडळी दर्या, पारनेर)

संगमनेर तालुक्यातील कारेगाव येथील झेडपीच्या शाळेतील शिक्षक रमेश शिवाजी आहेर याने आपल्या जागेवर परस्पर कमी रोजगार शिक्षकाची नेमणूक करून त्याच्याकडून अध्यापन करून घेतले जात असल्याची तक्रार सीईओ येरेकर यांच्याकडे करण्यात आली होती. येरेकर यांनी गुप्तपणे याबाबत खात्री केली असता आहेर याच्या विरोधातील तक्रार खरी असल्याचे स्पष्ट झाले. त्याचे निलंबन करून त्याला जामखेड मुख्यालय देण्यात आले आहे. याशिवाय संगमनेर तालुक्यातील जवळ बाळेश्वर शाळेचे प्रभाकर सखाराम रोकडे यांचे देखील निलंबन करण्यात आले.

स्वतःच्या जागेवर त्यांनी शिक्षक नेमणाऱ्या पारनेरमधील एकाला सेवेतून कमी करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करत असलेल्या बाजीराव पानमंद या शिक्षकाने स्वतःची पतसंस्था स्थापन केली. शिवाय, पतसंस्थेत नेमणूक असलेल्या कुलदीप जाधव या कर्मचाऱ्यांची आपल्या जागेवर शिक्षक म्हणून अनधिकृत नेमणूक केली.

त्याचा पगारही पतसंस्थेमार्फतच काढला. अनेक तक्रारीनंतर देखील शिक्षण विभागासह संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र एका ग्रामस्थांच्या तक्रारीवरून पारनेर पोलिसांच्या चौकशीत ही बाब समोर आली. पानमंद है गोरेगाव येथील गोरेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. गेल्या सात वर्षांपासून पानमंद यांच्या सांगण्यावरून शाळेत अध्यापन करीत असल्याचा लेखी जवाब या डमी शिक्षकाने गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांच्याकडे दिला होता.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यावर प्रशासकाची जबाबदारी आहे. त्यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 822
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.