Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सत्यजित तांबे यांच्या पाठीशी आणखी एक शिक्षक संघटना
राजकारण

सत्यजित तांबे यांच्या पाठीशी आणखी एक शिक्षक संघटना

कपिल पाटील यांनी जाहीर केला शिक्षक भारती संघटनेचा पाठिंबा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी प्रचारात वेग घेतला असतानाच एकापाठोपाठ एक शिक्षक संघटना त्यांना पाठिंबा देत आहेत. शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील यांनी तांबे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

काँग्रेस नेते आमदार सुधीर तांबे, सत्यजीत तांबे आणि कपिल पाटील यांच्यात महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर कपिल पाटील यांनी सत्यजीत तांबेंना पाठिंबा दिला. यापूर्वी तांबे यांना महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (मस्ट) आणि महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

नाशिक विभागातील कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून सुधीर तांबे यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते म्हणाले की, मी नाशिक पदवीधर मतदारसंघातून तीन निवडणुका लढवल्या. तीनही निवडणूक लढवत असताना सगळ्यांनी खूप चांगला पाठिंबा दिला. पहिल्या वेळेस मला पक्षाचा पाठिंबा नव्हता. म्हणजे मी अपक्ष होतो. पण सर्व शिक्षकांनी मला मनापासून पाठिंबा दिला होता. माझ्या मनात शिक्षकांबद्दल सदैव कृतज्ञतेची भावना आहे. मला शिक्षक भारती संघटनेने सहकार्य केलं. त्यामुळे यापुढे या मतदारसंघात शिक्षकांच्या हक्कासाठी एक आजी आणि एक माजी असे दोन आमदार असतील.

सामान्य माणसाचं शिक्षण महत्त्वाचं आहे. शिक्षणाची महत्त्वकांक्षा शिक्षकांच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. शिक्षकांना पेन्शन योजना मिळाली पाहिजे. शिक्षकांचे सर्व प्रश्न सुटायला हवेत. कपिल पाटील यांनी औरंगाबादला मोठा मोर्चा काढला होता. तेव्हा मी तिथे सुद्धा उपस्थित होतो. मी काही दिवसांनी माजी आमदार होणार आहे. पण माजी आमदार म्हणूनही काम करता येईल. शिक्षकांच्या हक्कासाठी दोन आमदार आमच्या परिवारातील राहतील. पुरोगामी विचारांशी आमची बांधिलकी कायम राहील, असंही सुधीर तांबे म्हणाले.

शिक्षक भारती मदतीला आली हे मी कदापिही विसरू शकणार नाही

या राज्यातील असा एकही तालुका नाही जिथे मी काँग्रेसचं काम केलेलं नाही. चांद्यापासून बांद्यापर्यंत मी काम केलंय. मित्र जमवण्याचं काम केलं. अनेक राजकीय संस्था आणि संघटनांवर मी काम करतोय. म्हणूनच कपिल पाटील यांच्या मनामध्ये गेली अनेक वर्ष होतं, खरंतर कपिल पाटील माझ्यासाठी विधानसभेचा मतदारसंघ शोधत होते. “ज्यावेळी आमच्या संपूर्ण परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं, तेव्हा कपिल पाटलांनी आम्हाला स्वतः फोन करून पाठिंबा दिला. अशा काळात कपिल पाटील आणि शिक्षक भारती आमच्या मदतीला धावून आली. हे मी कदापि विसरू शकणार नाही.” असं सत्यजीत तांबे यांनी सांगितलं. 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 190
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.