Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ई-फाइलिंगला नगरमध्ये वकिलांचा विरोध लाल फिती लावून कामकाज
न्यायालय

ई-फाइलिंगला नगरमध्ये वकिलांचा विरोध लाल फिती लावून कामकाज

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Close-up Of Male Judge In Front Of Mallet Holding Documents
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

अहमदनगर : ई फाइलिंगद्वारे सर्व न्यायालयांमध्ये केसेस दाखल करण्याचे निर्देश वकिलांना देण्यात आले आहे. जिल्हा आणि कनिष्ठ न्यायालयांसाठी ही ई-फायलिंग पद्धत संयुक्तिक ठरत नाही. ई-फायलिंग ही पद्धत अत्यंत किचकट, वेळखाऊ, खर्चिक व गुंतागुंतीची असल्याने ती जिल्हा व कनिष्ठ न्यायालयांसाठी बंधनकारक करण्यात येऊ नये, अशी मागणी शुक्रवारी अहमदनगर जिल्हा न्यायालयात करण्यात आली. त्यासाठी वकिलांनी लालफिती लावून कामकाज केल्याची माहिती बार असोशिएशनचे सचिव ॲड. गौरव दांगट यांनी दिली.

न्यायालयामध्ये लागू करण्यात आलेल्या ई-फायलिंग पद्धतीला नगर बार असोसिएशनने विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात १७ जानेवारीला बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेत या संबंधीचा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. बैठकीत सर्व न्यायालयांमध्ये ई-फायलिंगद्वारे केसेस दाखल करण्याचे देण्यात आलेले निर्देश जिल्हा न्यायालयासाठी व कनिष्ठ न्यायालयांकरीता संयुक्तिक नाही असे मत मांडण्यात आले.

ई- फायलिंग ही अतिशय किचकट, वेळखाऊ, खर्चीक व गुंतागुंतीची असुन जिल्हा न्यायालयांमध्ये काम करण्याकरीता वकीलांसाठी ती सोयीस्कर नाही. या प्रक्रियेमध्ये संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर किंवा स्मार्ट फोन यासोबत लागणारे इंटरनेट आवश्यक आहे. या सर्व गोष्टी अत्यंत खर्चीक असुन त्या जिल्हा न्यायालयातील वकीलांना परवडणार्‍या नाहीत. तसेच इंटरनेटची अपुरी सुविधा असल्याने व विद्युत पुरवठा तसेच तिथे असणारी प्रकरणे ही मुख्यत्वे ग्रामीण भागातील लोकांशी निगडीत आहेत. तसेच तिथे वारंवार विज पुरवठा खंडीत होणे व इंटरनेटची असुविधा, इंटरनेट सतत खंडीत होणे अशा अनेक अडचणी असल्यामुळे तसेच जिल्हा न्यायालयातील बहुंताशी वकीलांना संगणक हाताळण्याचे प्रशिक्षण व ज्ञान नाही, तशी न्यायालयामध्ये अद्यावत सुविधा उपलब्ध नाही.

त्यामुळे ई-फायलिंग पद्धती जिल्हा तसेच कनिष्ठ न्यायालयावर बंधनकारक करण्यात येऊ नये, अशी सुचना नगर असोसिएशनने केली. यासंबंधीचा ठराव सर्वानुमते पारीत करून तो सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय व अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालय, व अध्यक्ष बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांना पाठविण्यात येणार आहे.

ई-फायलिंग विरोधात वकिलांनी शुक्रवारी जिल्हा न्यायालयात लाल फिती लावून दिवसभर कामकाज केले. या आंदोलनात बार असोशिएशचे अध्यक्ष ॲड. संजय पाटील, उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ शिर्के, सचिव ॲड. गौरव दांगट यांच्यासह जिल्हा न्यायालयातील वकील सहभागी झाले होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 159
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.