Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मारहाण करणाऱ्या साकुरच्या ‘त्या’ बड्या पुढार्‍यांना अटकपूर्व जामीन नाहीच
न्यायालय

मारहाण करणाऱ्या साकुरच्या ‘त्या’ बड्या पुढार्‍यांना अटकपूर्व जामीन नाहीच

संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : ग्रामसभेत प्रश्न विचारल्याच्या कारणावरून राग अनावर झालेल्या गावातील सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी सामाजिक कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करीत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी तीन आरोपींना अटक झाल्यानंतर उर्वरित आरोपींनी साठी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
संगमनेर तालुक्यातील साकुर ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालानंतर झालेल्या ग्रामसभेमध्ये सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांनी बंद केलेल्या पाणीपुरवठा संदर्भात प्रश्न विचारला होता. इघे यांनी ग्रामसभेत विचारलेला प्रश्न सत्ताधाऱ्यांना रुचला नाही त्यामुळे त्यांनी त्याला ग्रामसभेतच धमक्या दिल्या होत्या.
त्यानंतर इघे आपल्या मित्रासोबत साकुर कडे जात असताना जवळच्या घाटामध्ये पंधरा-वीस जणांच्या टोळक्याने त्यांना गाठत लोखंडे रॉड, काठ्या, कोयत्याने गंभीर मारहाण केली होती. तसेच रिवाल्वर दाखवत जीवे मारण्याची देखील धमकी इघे यांना देण्यात आली होती. अर्धमेल्या अवस्थेत इघे यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले होते.
त्यानंतर घारगाव पोलिसांनी इघे यांच्या तक्रारीवरून गावातील सोळा बड्या पुढार्‍यांसह आणखी पंधरा-वीस जणांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. सत्ताधारी गावपुढारी असलेले यातील काही आरोपी राज्याचे माझे महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या बड्या संस्थांचे पदाधिकारी आहे. आरोपींची प्रतिष्ठा आणि राजकीय वजन लक्षात घेता याप्रकरणी पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव असल्याचे बोलले जात होते. संगमनेरचे प्रभारी पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे. यातील तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केले असून उर्वरित आरोपी फरार असल्याने त्यांनी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता.
न्यायाधीश वाय. पी. मनाटकर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपींना अटकपूर्व जामीन नाकारला आहे. त्यामुळे आता आरोपींसमोर पोलिसांना शरण येणे अथवा उच्च न्यायालयात जाणे एवढाच पर्याय राहिला आहे. प्रतिष्ठित आरोपींवर काय कारवाई होते, याकडे पठार भागातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 400
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.