Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहाणे मास्तर कामगार विश्वातील कर्मवीर : राजेश मालपाणी
सामाजिक

सहाणे मास्तर कामगार विश्वातील कर्मवीर : राजेश मालपाणी

कामगार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या पाच जणांचा पुरस्कार देवून सन्मान
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क 

संगमनेर : दिवंगत कामगार नेते कॉम्रेड पंढरीनाथ सहाणे मास्तर म्हणजे अखेरच्या श्वासापर्यंत कामगारांच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करणारे कर्मवीर होते. त्यांनी हजारो कामगारांचे नेतृत्व केले. संघर्षाऐवजी समन्वयाच्या भूमिकेवर त्यांचा अधिक भर होता. त्यामुळेच कामगारांच्या परिवारांनाही उज्ज्वल भवितव्यासाठी दिशा दाखवण्याचे कार्य त्यांच्या हातून घडले, असे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख राजेश मालपाणी यांनी केले.

दिवंगत कामगार नेते कॉम्रेड पंढरीनाथ सहाणे मास्तर यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त विविध क्षेत्रातील गुणवंतांना सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मालपाणी बोलत होते. यावेळी मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी, महाराष्ट्र राज्य विडी कामगार सभेचे अध्यक्ष कॉ. कारभारी उगले, कॉ. ज्ञानदेव सहाणे, कामगार नेते कॉ. माधव नेहे, कॉ. सुभाष कडलग, कॉ. शांताराम वाळुंज उपस्थित होते.

यावेळी राजेश मालपाणी यांनी उद्योग समूहातील व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील स्नेहपूर्ण संबंधांचा सविस्तर आढावा घेतला. 1988 नंतर मागील 35 वर्षात मालपाणी उद्योग समूहामध्ये एकही संप झाला नाही, ही गोष्ट मालक आणि कामगार यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंधांवर प्रकाश टाकण्यासाठी पुरेशी आहे. संवादाने प्रगती होते, संघर्षाने होत नाही हे दोन्ही बाजूंना पटल्यामुळे हातात हात घालून आजवरची वाटचाल यशस्वी झाली आहे. मालपाणी उद्योग समूहाने नेहमीच कामगार कल्याणाचे धोरण अवलंबले आहे. त्यातूनच शासनाचे सहकार्य नसतानाही कामगारांच्या घरकुलांचे प्रकल्प साकारले गेले. कामगारांच्या मुला-मुलींनी देदीप्यमान शैक्षणिक प्रगती करून आपल्या माता-पित्यांच्या कष्टाचे चीज केले, असेही ते म्हणाले.
मनीष मालपाणी यांनी कॉ. पंढरीनाथ सहाणे मास्तर म्हणजे योगी पुरुष होते अशा शब्दात त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. टाळेबंदीच्या काळातही मालपाणी उद्योग समूहाने कामगारांना दूर लोटले नाही, त्यांची सर्वार्थाने काळजी घेतली. त्यामुळे टाळेबंदीनंतर उद्योग समूहाने जोरदार भरारी घेतली. उद्योग समूहातील कामगार बंधू-भगिनी आणि मालपाणी परिवार यांचे नाते हे वर्षानुवर्षे एका कुटुंबासारखे आहे. भगवद्गीतेत सांगितलेल्या कर्मयोगाच्या सिद्धांतावर मालपाणी उद्योग समूहाची उभारणी झाली असून त्याच तत्त्वावर वाटचाल सुरू आहे.

कॉ. कारभारी उगले यांच्या मानपत्राचे वाचन व्यवस्थापक रमेश घोलप यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ. ज्ञानदेव सहाणे यांनी केले. सूत्रसंचालन अर्चना मिश्रा यांनी तर कॉ. सुभाष कडलग यांनी आभार मानले.

यावेळी कामगारांच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या कॉ. कारभारी उगले यांना विशेष समाजसेवा पुरस्कार, सोमनाथ वडतल्ले यांना कामगार क्षेत्रातील विशेष पुरस्कार, संजय परदेशी यांना युनियन कार्यकर्ता पुरस्कार, सविता अशोक भंडारी आणि नवनाथ वावरे यांना गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 415
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.