Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मोहसीन शेख हत्या प्रकरणातून हिंदू राष्ट्र सेना प्रमुखासह वीस जणांची निर्दोष मुक्तता
न्यायालय

मोहसीन शेख हत्या प्रकरणातून हिंदू राष्ट्र सेना प्रमुखासह वीस जणांची निर्दोष मुक्तता

पुणे न्यायालयाचा निर्णय
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क | पुणे

पुण्याच्या न्यायालयाने शुक्रवारी एक महत्त्वाचा निवाडा केला आहे. मोहसीन शेख या तरुणाची हत्या केल्याच्या आरोपातून हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई व संघटनेच्या २० जणांची निर्दाेष सुटका केली.

सोशल मिडियावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. तेव्हा धनंजय देसाईने चिथावणीखोर भाषण केले होते. त्यानंतर शेख हा त्याचा भाऊ व मित्रांसह हडपसर येथील एका मशिदीत जात होता. तेथे बाईकवरून काहीजण आले. शेखच्या डोक्यावर टोपी होती.

एवढ्या एका कारणावरुन शेख व त्याच्या मित्रांवर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. शेखला बॅटने मारहाण झाली. या मारहाणीत शेखचा मृत्यू झाला. हडपसर येथे २ जून २०१४ रोजी हा प्रकार घडला होता. शेखच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली होती.

शेख हा मुळचा सोलापूरचा रहिवाशी होता. तो पुण्यात आय. टी. कंपनीत काम करत होता. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केला. ही हत्या हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. याप्रकरणी देसाईलाही अटक झाली.

न्यायालयात देसाईसह संघटनेच्या २० कार्यकर्त्यांवर शेखच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणात ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली, मात्र काही दिवसांनी निकम यांनी या खटल्यातून माघार घेतली. मात्र खटला सुरु राहिला.

आरोपींवर आरोप निश्चिती झाली. त्यांनी आरोप फेटाळल्यानंतर सरकारी पक्षाने त्यांच्याविरोधात सबळ पुरावे सादर केले. मात्र न्यायालयाने शुक्रवारी निकाल देत देसाईसह सर्व आरोपींची शेखच्या हत्येतून सुटका केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 259
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.