Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गोवंश जनावरांसह सुमारे सव्वा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत
गुन्हेगारी

गोवंश जनावरांसह सुमारे सव्वा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत

शहर पोलिसांच्या एकापाठोपाठ दोन कारवाया
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 28, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क | संगमनेर

संगमनेर शहर पोलिसांनी दोन पिकअप वाहनांवर केलेल्या कारवाई सुमारे सव्वा आठ लाख रुपयांचा मुद्देमात हस्तगत केला आहे. ६ जिवंत गोवंश जनावरांसह सुमारे दोन लाख रुपयांच्या गोमांसाचा यात समावेश आहे.

राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असला तरी देखील संगमनेरमध्ये मात्र या कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन सुरूच आहे. याला स्थानिक पोलिसांचे देखील पाठबळ मिळत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शेकडोने टाकलेल्या छाप्यानंतर देखील येथील बेकायदा कत्तलखाने अद्याप बंद झालेले नाहीत. वारंवार टाकले जाणारे छापे आणि या छाप्यामध्ये निष्पन्न होणारे तेच तेच आरोपी यामुळे पोलिसांची कार्यपद्धतीच संशयास्पद बनली आहे. प्रत्येक कारवाईमध्ये आरोपी फरार असल्याचे दाखविले जाते. त्यामुळे पोलीस अशा प्रकारच्या छाप्यामधून नेमके काय साध्य करतात असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

शुक्रवारी मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी नाशिक-पुणे महामार्गावर हॉटेल सम्राट समोर पोलीस पथकाने जाणारी पिक अप जीप अडवत तिची तपासणी केली असता त्यामध्ये कत्तलीच्या उद्देशाने सहा जिवंत जनावरांचे वाहतूक केले जात असल्याचे निष्पन्न झाले.

या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल भास्कर महादू पिचड यांनी यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीवरून इरफान नूर कुरेशी (रा. वडाळा नाका, नाशिक), जावेद सुलताना कुरेशी (रा. वडाळा गाव, नाशिक) आणि जाकीर बशीर शहा (रा. वडाळा गाव नाशिक) या तिघांविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी पिकअप जीप, ६ जिवंत गोवंश जनावरांसह ४ लाख ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

तर शनिवारी मध्यरात्री केलेल्या दुसऱ्या कारवाईमध्ये संगमनेर खुर्द गावच्या शिवारात शिबलापुर-पिंपरणे रस्त्यावर असलेल्या शेतकी संघाच्या पेट्रोल पंपासमोर पोलीस पथकाने संशयित पिकअप जीप थांबविली असता, तपासणीमध्ये त्यात सुमारे दोन लाख रुपये किमतीचे जिवंत जनावरांचे कत्तल केलेले मांस आढळून आले. या कारवाईमध्ये पोलिसांनी गोमांस आणि पिकअप जीप असा ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेश कारभारी गोलवड यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हलीम युसुफ शेख (ह. रा. भारतनगर, मूळ रा. कासारा, ता. इगतपुरी) याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे शहर पोलिसांनी दोन्ही कारवाईमध्ये चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असला तरी देखील एकाही आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 228
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 17, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आशादायी आणि प्रगतीकारक ठरेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली…

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे

July 16, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.