Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अपक्ष सत्यजित तांबे अखेर झाले आमदार सत्यजित तांबे; नाशिक पदवीधरमधून मोठा विजय
राजकारण

अपक्ष सत्यजित तांबे अखेर झाले आमदार सत्यजित तांबे; नाशिक पदवीधरमधून मोठा विजय

तांबे समर्थकांनी केला मोठा जल्लोष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/02/2023No Comments4 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवीन आमदार म्हणून निवडून आले आहेत. या मतदारसंघावर सलग चौथ्या निवडणुकीतही तांबे यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. सत्यजित तांबे यांनी अपेक्षित मतांचा कोठा पूर्ण केला. त्यांनी महाविकास आघाडीने परस्पर केलेल्या शुभांगी पाटील यांचा पराभव केला आहे.
राजकीय घडामोडींमुळे रंगतदार ठरलेल्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघात कोण गुलाल उधळणार याविषयी आता राजकीय चर्चांना जोर आला होता. महाविकास आघाडीची उमेदवारी मिळून देखील आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलगा सत्यजित तांबे याचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मुदतीत एबी फॉर्म न मिळाल्याने तांबे यांनी आपले उमेदवारी अपक्ष असल्याचे सांगितले होते. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल न करणाऱ्या आमदार सुधीर तांबे आणि बंडखोरी करणाऱ्या सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली. सत्यजित तांबेंची बंडखोरी आणि ऐनवेळी महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवत रिंगणात उतरलेल्या शुभांगी पाटील यांच्यासह १६ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला गुरुवारी मतमोजणीतून झाला. सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील या दोन उमेदवारांमध्ये प्रमुख लढत झाली असल्याच्या निवडणूक निकालातून समोर आले आहे.
गुरुवारी नाशिकच्या सय्यद पिंप्री येथील नवीन शासकीय गोदामात मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीकरीता ३०० अधिकारी, कर्मचारी तसेच २५० पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
पदवीधर निवडणुकीसाठी ३० जानेवारी रोजी विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांमध्ये ३३८ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यंदा गतवर्षीपेक्षा पाच टक्के मतदान कमी झाले. विभागात ४९.२८ टक्के मतदान झाले. विभागातील २ लाख ६२ हजार ६७८ पैकी १ लाख २९ हजार ४५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी घसरल्याने त्याचा निकालावर काय परिणाम होईल याचे आडाखे उमेदवारांच्या समर्थकांकडून बांधले जात होते.
प्रत्यक्ष मतपत्रिकांची मोजणी झाल्यानंतर निवडून येण्यासाठी 58,310 मतांचा कोठा निश्चित करण्यात आला होता. सत्यजित तांबे व शुभांगी पाटील या दोन प्रमुख उमेदवारांसह बहुजन आघाडीचे रजन बनसोडे, स्वराज्य संघटनेचे सुरेश पवार यांच्यासह १६ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. पाटील या धुळयाच्या तर तांबे हे नगर जिल्हयातील आहेत. तांबे यांना भाजपकडून छुप्या पध्दतीने बळ मिळाले तरी आपण अपक्षच आहोत अशी भूमिका मांडली. तर पाटील यांच्या पाठीशी महाविकास आघाडीने ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला. एकाही पक्षाचा अधिकृत उमेदवार या निवडणुकीत नसल्याने अपक्ष उमेदवारांच्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तांबे यांच्या खेळीतून काय साध्य झाले हे निकालातून समोर आले आहे.
पहिल्या पसंतीची सर्वाधिक ६८ हजार ९९९ मत मिळवून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी श्री. तांबे यांना प्रमाणपत्र देवून विजयी उमेदवार म्हणून घोषित केले.
सत्यजित तांबे यांनी निश्चित कोट्यापेक्षा १० हजार ६८९ मते अधिक प्राप्त केली.त्यांना ६८ हजार ९९९ मत प्राप्‍त झाली आहेत. एकूण मतमोजणी नतंर १ लाख १६ हजार ६१८ मत वैध ठरली तर १२ हजार ९९७ मत अवैध ठरल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी निवडणूक निरीक्षक डॉ. निपुण विनायक, जिल्हाधिकारी नाशिक तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गंगाथरण् डी., जिल्हाधिकारी अहमदनगर तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी धुळे तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा, जिल्हाधिकारी जळगाव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमन मित्तल, जिल्हाधिकारी नंदूरबार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे, उपायुक्त उन्मेष महाजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक उपस्थित होते.

अशी झाली मतमोजणी
सैय्यद पिंप्री येथील गोदामात मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरूवात झाली. प्रथम सर्व ३३८ मतदान केंद्रांवरील मतपत्रिकांचे ५०-५० चे गठठे करण्यात आले. या गठठयांचे एत्रिकरण झाल्यानंतर प्रत्येक टेबलावर एक हजार याप्रमाणे एकूण २८ टेबलांवर पहिल्या पसंतीच्या मतमोजणीस सुरूवात झाली. पाच फेर्‍यात ही मतमोजणी घेण्यात आली यात अपेक्षित मतांचा कोठा तांबे यांनी पूर्ण केला. त्यामुळे दुसऱ्या पसंतीचे मते मोजण्याची वेळ प्रशासनावर आली नाही.

उमेदवारनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे
वैध ठरलेल्या मतांपैकी एकूण 16 उमेदवारांना प्राप्त पहिल्या पसंतीचे मते पुढील प्रमाणे
=========================
➡️ सत्यजित सुधीर तांबे : 68999
➡️ शुभांगी भास्कर पाटील: 39534
➡️ रतन कचरु बनसोडे :2645
➡️ सुरेश भिमराव पवार :920
➡️ अनिल शांताराम तेजा :96
➡️ अन्सारी रईस अ.अब्दुल कादीर :246
➡️ अविनाश महादू माळी :1845
➡️ इरफान मो इसहाक :75
➡️ ईश्वर उखा पाटील :222
➡️ बाळासाहेब रामनाथ घोरपडे :710
➡️ ॲड. जुबेर नासिर शेख :366
➡️ ॲड.सुभाष राजाराम जंगले :271
➡️ नितीन नारायण सरोदे :267
➡️ पोपट सिताराम बनकर :84
➡️ सुभाष निवृत्ती चिंधे :151
➡️ संजय एकनाथ माळी :187

याशिवाय राज्यातील विधान परिषदेच्या पाचही जागांवरील हे आहेत निवडून आलेले नवे आमदार
Ⓜ️कोकण:- ज्ञानेश्वर म्हात्रे (भाजप)
Ⓜ️नागपूर:- सुधाकर आडबाले (मविआ)
Ⓜ️औरंगाबाद:- विक्रम काळे (मविआ)
Ⓜ️अमरावती:- धीरज लिंगाडे (मविआ)
Ⓜ️नाशिक:- सत्यजित तांबे (अपक्ष)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 477
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.