Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिक पदवीधरमधील पराभूत उमेदवार शुभांगी पाटील यांनी घेतला हा मोठा निर्णय
राजकारण

नाशिक पदवीधरमधील पराभूत उमेदवार शुभांगी पाटील यांनी घेतला हा मोठा निर्णय

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
नाशिक पदवीधर निवडणुकीत निवडून आलेल्या सत्यजित तांबे यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शुभांगी पाटील यांनी शनिवारी अधिकृतरित्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. याचबरोबर त्यांनी आपला धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी केल्यानंतर शिवसेनेने पाटील यांना पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर त्यांना महाविकास आघाडीने आपला पाठिंबा जाहीर केला. तांबे यांच्या विरोधात कडवे झुंज देताना पाटील यांनी या मतदारसंघात सुमारे 40 हजार मते मिळविली. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या पाटील यांना भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी मातोश्रीचे दरवाजे ठोठावत शिवसेनेचा पाठिंबा मिळविला होता.
निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या हाती शिवबंधन बांधले. त्यानंतर आता खरी लढाई सुरू झाल्याचा सुचक इशारा शुभांगी पाटील यांनी दिला आहे. शिवसेनेत प्रवेश केलेल्या शुभांगी पाटील आता या मतदारसंघात नव्याने बांधणी करणार आहे. मातोश्री बाहेर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या मी दोन फेब्रुवारीलाच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार मी शनिवारी मी शिवबंधन हाती बांधले आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे विजयी झाले असले तरी मला हे जवळपास 40000 मते पडली आहे. एका सामान्य लेकीच्या मुलीने एवढी मते मिळविणे म्हणजे सामान्य बाब नाही. ही कमी पुढील निवडणुकीत भरून काढू. शिवसेना पक्ष माझ्यावर जी जबाबदारी सोपवेल ती जबाबदारी मी पार पाडेल. निवडणुकीत मी कुठे कमी पडले याचा विचार करून पुन्हा कामाला लागणार आहे. महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडी निवडणुकीत माझ्यासोबत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर माझ्यासाठी नाशिकमध्ये दोन सभा घेतल्या, असे देखील त्यांनी सांगितले.
निवडणुकीतील पराभवानंतर पाटील म्हणाल्या होत्या झाशीची राणी जशी लढली तसे मला लढायचे होते. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार मी शिवसेनेला कधीही सोडणार नाही. मी शिवसैनिक आहे, आणि शिवसैनिकच राहणार. शुभांगी पाटील यांच्या या वक्तव्यावर भाजपने टीका करत महाविकास आघाडीला लक्ष केले होते. झाशीच्या राणीसोबत केलेली तुलना महाविकास आघाडीच्या नेत्यांना चालते का असा सवाल भाजपचे अतुल भातखळकर यांनी केला होता.
धरणे आंदोलन करणारच
पाटील म्हणाल्या शिवसेनेतील प्रवेशानंतर माझी खरी लढाई आता सुरू झाली आहे. जुनी पेन्शन योजना, बेरोजगारीच्या मुद्द्यावर मी आता आक्रमकपणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधणार आहे. या मुद्द्यावर मी एक दिवस धरणे आंदोलन करणार आहे तसेच महाराष्ट्राच्या प्रत्येक शिवसैनिकापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न असेल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 822
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

By Annant Ppangarkar18/10/20260

प्रवीण पुरो- भारतीय संविधानाने घटनात्मक अधिकार दिलेल्या कोणत्याही संस्थेवर पक्षपातीपणाचा वा राजकीय वरदहस्ताचा आरोप झाला,…

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.