Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/02/2023Updated:07/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
मुंबई
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी आपल्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. थोरात यांनी आपला राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठविला असून काँग्रेस हाय कमांड या संदर्भात काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे .
दरम्यान थोरात यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची संबंधित असलेले थोरात काँग्रेसमधील वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस मधील काही नेत्यांवर थोरात नाराज असून या संदर्भात त्यांनी पक्षश्रेष्ठींना सविस्तर पत्र पाठवले असल्याची माहिती दोन दिवसापूर्वी त्यांनी संगमनेर येथील एका कार्यक्रमात ऑनलाइन संबोधित करताना दिली होती.नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून पक्षांतर्गत रंगलेले राजकारण थोरात यांच्या राजीनाम्यास कारणीभूत ठरले आहे. विशेष म्हणजे आज थोरात यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी आपला राजीनामा काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठविल्याची माहिती पुढे येत आहे.
दरम्यान या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रकृती चांगली नसल्याने ते आमच्याशी बोलत नाही. त्यांचा कुठलाही राजीनामा आमच्याकडे आलेला नाही, असे म्हटले आहे. मात्र या संदर्भातील वृत्त काही वाहिन्यांनी प्रसिद्ध केले आहे.
विधानपरिषद निवडणुकीचे कवित्व अजूनही संपलेले दिसत नाही. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अधिवेशनादरम्यान थोरात मॉर्निंग वापरत असताना पडल्याने त्यांच्या खांद्याला जबर दुखापत झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्णतः आरामाचा सल्ला दिल्याने विधान परिषद निवडणूक काळात थोरात कोठेही नव्हते. याच दरम्यान थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि निवडून देखील आले. तसेच यासंदर्भात त्यांनी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नव्हती. निवडणूक निकालानंतर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शनिवारी संगमनेरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ऑनलाईन संवाद साधत प्रथमत:च भूमिका जाहीर केली. यानंतर पक्षात मोठा गदारोळ उडाला होता.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 769
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.