Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदारपदाची शपथ घेताच सत्यजित तांबे यांनी शिक्षण मंत्र्यांना धाडले पत्र; म्हणाले, शिक्षकांच्या प्रश्नासंबंधी चर्चा साठी वेळ द्या
राजकारण

आमदारपदाची शपथ घेताच सत्यजित तांबे यांनी शिक्षण मंत्र्यांना धाडले पत्र; म्हणाले, शिक्षकांच्या प्रश्नासंबंधी चर्चा साठी वेळ द्या

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी बुधवारी विधानपरिषदेत शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर लगेचच त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात पत्र देत चर्चेसाठी वेळ मागितली आहे.गेली तेरा वर्ष नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून डॉ. सुधीर तांबे यांनी सभागृहात लक्षवेधी कामगिरी केली आहे. शिक्षक पदवीधरांच्या प्रश्नावर त्यांनी सभागृहात सातत्याने आवाज उठविला. यावेळी मात्र तांबे यांनी उमेदवारी मिळवून देखील आपले पुत्र सत्यजित तांबे यांच्यासाठी निवडणूक न लढवत त्यांना अपक्ष निवडून आणले आहे. राज्याच्या राजकारणात आक्रमक नेता म्हणून ओळखले जाणारे सत्यजित तांबे यांनी पहिल्याच दिवशी आपल्या कामकाजाला धडाकेबाज सुरुवात केली आहे.
तांबे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पत्र पाठविले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान देण्याबाबत व शिक्षण सेवकांचे मानधन वाढविण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केले, हे दोन अतिशय चांगले निर्णय घेतले त्याबद्दल आपले आभार. परंतु विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय काढताना त्यामध्ये शाळांना पुन्हा तपासणीची अट घातलेली आहे. मुळातच या अगोदर देखील अनेक वेळा या शाळा, वर्ग व तुकड्यांची तपासणी झालेली असून ही अट काढून सर्वांना अनुदान सुरू करावे. तसेच शिक्षण सेवकांचे मानधन आपण वाढविले परंतु इथून पुढे शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ ही महागाई निर्देशांकानुसार आपोआप व्हावी.
तसेच शिक्षणाचे इतरही अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यामध्ये जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न हा अत्यंत गांभीर्याचा असून त्यासाठी आपण मला चर्चेसाठी वेळ द्यावा. अशी मागणी करणारे पत्र विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजित तांबे यांनी दिले आहे. तांबे यांच्या या पत्रात संदर्भात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 585
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.