Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गोवंश तस्करीचे संगमनेर कनेक्शन समोर; पोलिसांनी पकडलेल्या आयशरमधून कत्तलीसाठी नेली जात होती 45 गोवंश जनावरे
गुन्हेगारी

गोवंश तस्करीचे संगमनेर कनेक्शन समोर; पोलिसांनी पकडलेल्या आयशरमधून कत्तलीसाठी नेली जात होती 45 गोवंश जनावरे

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/02/2023Updated:08/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
एका आयशर टेम्पोमधून कत्तलीसाठी नेली जात असलेली तब्बल पंचेचाळीस जिवंत गोवंश जनावरे राहुरी पोलिसांनी पकडली आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत पुन्हा एकदा संगमनेर कनेक्शन समोर आले आहे. यामुळे संगमनेरची बदकीर्ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
संगमनेर येथून वांबोरी मार्गे अहमदनगर येथे चाललेल्या एका आयशर टेम्पोतून या जनावरांची निर्दयपणे वाहतूक केली जात होती. पोलीस हवालदार दिनकर चव्हाण, पोलीस नाईक नदिम शेख, सचिन ताजणे, गणेश लिपने, चालक साखरे या पोलीस पथकाने राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील केएसबी चौकात रात्री दहा वाजेदरम्यान सापळा लावला होता.
त्यावेळी तेथे एक आयशर टेम्पो (एमएच 17 बीवाय 2478) आला. पथकाने त्या टेम्पोला थांबवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंश जनावरे आढळून आली. टेम्पो चालकाकडे चौकशी केली असता त्याने सदर जनावरे संगमनेर येथील ग्रामीण भागातून शेतकर्‍यांकडून विकत घेऊन कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती दिली. पोलीस पथकाने 50 हजार रुपये किंमतीच्या 5 जर्सी गाई, 40 हजार रुपये किंमतीची 40 वासरे तसेच 5 लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो असा एकूण 5 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस नाईक गणेश लिपने यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी महंमद रफिक उस्मान कुरेशी, वय 32 वर्षे, रा. मदिनानगर, ता. संगमनेर. याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. 130/2023 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 नूसार 11 (1) (एफ), महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम 1976 नुसार 5 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पकडलेल्या आयशरमधून जनावरांना घेऊन जाणारा आरोपी हा संगमनेरचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. कत्तलीसाठी तालुक्यातून व इतरत्र भागातून संगमनेरात गोवंशांची जनावरे आणली जात असून त्यांची कत्तल केली जाते हे स्पष्ट झाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 296
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

By Annant Ppangarkar01/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका व्यक्तीच्या डोक्यात व तोंडावर दगड मारून…

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.