Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मोदींच्या अदानी लाचारीची हद्द
महाराष्ट्र संवाद विशेष

मोदींच्या अदानी लाचारीची हद्द

सनम हम आपको ले के डुबेंगे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/02/2023No Comments6 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

लेखक दैनिक आपलं महानगर चे माजी निवासी संपादक आहेत
रविवार विशेष | प्रवीण पुरो
गौतम अदानींच्या संपत्तीचा मामला आता प्रत्येकाचं घर घेरणारा ठरू लागला आहे. मी बुडेन पण तुम्हाला घेऊनच, या तयारीने अदानींच्या साम्राज्याला हादरे बसू लागले आहेत. जितक्या जलद वर जावं तितक्याच जलद गतीने खाली येण्याची क्रिया ही नैसर्गिक आहे. म्हणूनच अशियात श्रीमंती गाठण्यासाठी धिरुभाई अंबानींना 60 वर्षांचा काळ कामी घालावा लागला. 2014 मध्ये ज्या व्यक्तीची श्रीमंती जगात 120 क्रमांकावर होती ते मोदी सत्तेच्या आठ वर्षात दुसर्‍या क्रमांकावर पोहोचत असेल तर संशयाला बाधा उत्पन्न होणारच.
अदानींच्या या श्रीमंतीचं राज काय, असा प्रश्‍न कोणी विचारला आणि पंतप्रधान तोंडाचा चंबू करून भाषणं देत बसले आणि नेहरू-गांधी घराण्यावर बोटं मोडत राहिले तर संशय अधिकच बळावतो. अशावेळी पाठिराख्यांच्या आरोळ्या कायम साथ देतील असं नाही. लोकांनाही आता अदानी आणि मोदींच्या संबंधांच्या गाथा कळून चुकल्यात. संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यापासून ज्या कारणाने अधिवेशन दररोज रोखलं जातं त्या अदानींच्या साम्राज्याची चिरफाड होत असताना पंतप्रधान मोदी एका शब्दात खुलासा करत नाहीत, याचा अर्थपूर्ण संबंध कोणी लावला तर कोणाला दोष देता येणार नाही. खोटेपणामुळे अदानींना बसत असलेल्या हादर्‍यांचा एकट्या भाजपला फटका बसला असता तरी कोणाला त्याचं काही वाटलं नसतं. भाजपच्या खासदारांनी तर आपलं इमानही विकल्याने यावर बोलण्याचा अधिकारच त्यांना राहिलेला नाही. पण ज्या सामान्य माणसाने सुरक्षेसाठी स्टेट बँकेत पुंजी टाकलीय, ज्यांनी आपल्या जिविताच्या संरक्षणासाठी एलआयसीत साठवणूक केलीय त्याच रक्कमेची वासलात मोदींच्या सरकारने अदानींसाठी लावल्याने देशातल्या प्रत्येक व्यक्तीला घोर लागलाय.
अदानींचे शेअर विकत घेतलेले काय ते पाहातील, असेही काहींना वाटत असेल. पण आता हे सगळं डोक्यावरून गेलंय. अदानी बुडतीलच, भाजप राजकीयदृष्ट्या बुडेल. केवळ त्यांच्या पुरतं हे मर्यादित असतं तरीही दुर्लक्ष करता आलं असतं. पण सामान्यंचं काय? याकरताच मोदींच्या स्पष्टीकरणाची प्रत्येक भारतीयाला अपेक्षा होती. रात्रीच्या खाण्याची भ्रांत ठेवून गाढव दिवसभर ओझं वाहतं तसं भाजपचे खासदारांचं आणि मोदी भक्तांचं सध्या सुरू आहे. ही माणसं अब्जावधीचा भ्रष्टाचार होऊनही खोटारडेपणाचे आणि लुटमारीचे ओझे वाहत मोदींचा उदो उदो करत आहेत. मोदी सरकारच्या अदानी लाचारीचा हा फटका आहे. तो सहजासहजी संपणार नाही. देश बुडवून तो रसातळाला जाईल तेव्हाच या माणसांचे डोळे उघडतील.
देश चालवताना सत्तेचं केंद्रिकरण होऊ नये, असं तत्व आहे. तसं व्यवसाय करताना एका उद्योगाकडे त्याचं केंद्रिकरण होऊ नये, याची दक्षता घेतली जायची. यामुळेच देशातल्या खासगी उद्योगांनी आपल्या उद्योगासाठी वेगवेगळी क्षेत्रं निवडली. त्यात उद्योगांची वाढही झाली. आणि क्षेत्र विस्तारलं. त्यांनी इतर उद्योगांवर कब्जा केला नाही. ज्यावर वकूब आहे तेच क्षेत्र घेऊन उद्योगांनी आपल्या उद्योगाला वर नेलं. याला अपवाद अदानी ठरले. सरकारने करायची कामं मोदींनी अदानींच्या गळ्यात घातली आणि देश ही कमिशनवर चालणारी संस्था करून टाकली. एकाच्याच गळ्यात सारे उद्योग गेले आणि तोच भिकारी बनला तर देशाचं काय होणार, हा साधा प्रश्‍न मोदींना आणि त्यांच्या सरकारला पडला नाही. तोच प्रश्‍न आता भारतातील जनता विचारत आहे. याचं उत्तर देण्याची हिंमत भाजपच्या एकाही कार्यकर्ता आणि नेत्याला नाही.
मोदींच्या सरकारने देशातील फायद्याचे सगळेच उद्योग अदानींना दिले आहेत. साम्राज्य हादरलं तर हे सगळे उद्योग चालवणं अदानींना अवघडच नाही तर अशक्य ठरेल. आधीच जग मंदीच्या छायेत आहे. येत्या वर्षभरात येऊ घातलेल्या संभाव्य मंदीतून बाहेर पडण्यासाठी आतापासूनच प्रत्येक देश धडपडत आहे. आणि आपण मंदीत गुरफटून जाण्यासारखे निर्णय घेऊन स्वत:ला कफल्लक बनवत आहोत, याची जाण मोदी सरकारला नाही. अदानींचा सर्वात मोठा ब्रॅण्ड असलेल्या फॉर्च्यून या तेल उद्योगाने देशभरचं मार्केट काबीज केलं आहे. एकूण तेलाच्या 16 टक्के इतक्या खाद्य तेलाचा वाटा एकट्या अदानींच्या विलमर या ब्रॅण्ड म्हणजे फॉर्च्यून खाद्य तेलाचा आहे. याच ब्रॅण्डच्या नावाने तांदळापासून, गव्हाच्या पिठापर्यंत गृहिणींना लागणार्‍या बहुतांश वस्तू बाजारात आहेत.
किराणाचा पुरवठा करणारा विलमर हा चवथ्या क्रमांकाचा ब्रॅण्ड मानला जातो. अदानी बुडाले तर देशातील किराणा मालाचे भाव वाढणं स्वाभाविक आहे.
अदानींच्या उद्योगाचं सर्वात मोठं क्षेत्र हे वीज उत्पादनात सामावलं आहे. ग्रीन ऊर्जा श्रोताच्या माध्यमातून अदानींनी देशाला पिंजून काढलंय. या उद्योगासाठी लागणार्‍या कोळशाचा पुरवठा केंद्राच्या मदतीने आपल्याकडे घेण्यात अदानी यशस्वी झालेत. याच कोळशासाठी मोदींनी अदानींना सोबत घेऊन ऑस्ट्रेलियापुढे मिनतवारी केली होती. या कोळशाच्या उत्पादनावर देशातील वीज प्रकल्प ताब्यात घ्यायचे आणि देशांतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना हा कोळसा सक्तीने विकत घ्यायला लावायचा फंडा सुरू झाला. आता तर श्रीलंकेला वीज पुरवठा करण्यासाठी छत्तीसगडमध्ये प्रकल्प उभारण्याचा अदानींचा प्रयत्न सुरू आहे. अदानी हे कोळशाचं उत्पादन घेणारे देशातले पहिल्या क्रमांकाचे उद्योजक ठरले आहेत. हे झालं वीज उत्पादनाचं.
हेच उत्पादन ग्राहकांच्या घरोघर पोहोचवण्यासाठी अदानींची पुढची मोहिम सुरू आहे. इतर राज्य लाचार झाल्यानंतर महाराष्ट्रानेही अदानींपुढे नांगी टाकली आणि वितरणही त्या उद्योगाला देण्याचा विषय चर्चेला आला. याला विरोध म्हणून सारं राज्य महिनाभरापूर्वी अंधारात जाण्याची वेळ येऊन ठेपली. वीज कंपन्यांच्या कर्मचार्‍यांनी नाक दाबल्यावर शिंदे-फडणवीस सरकार नमलं.
‘अदानी टोटल’ या उद्योगातून देशातील तेल आणि वायू उत्पादनात अदानींनी पाऊल टाकलं. ओएनजीसीकडून आजवर भारतासाठी आवश्यकतेपैकी 35 टक्के इतक्या तेलाचं उत्पादन केलं जायचं. आता ओएनजीसीचा हा मक्ता रिलायन्स आणि अदानींना वाटून बहाल करण्याची तयारी मोदींच्या सरकारची सुरू आहे. तेल आणि वायू उत्पादनाचा हा उद्योग सर्वात फायद्याचा असूनही त्याचं खासगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज अदानी ही या क्षेत्रातील दुसर्‍या क्रमांकाची कंपनी बनली आहे. पाईपलाईनद्वारे सीएनजी घराघरात पोहोचवण्याचं सर्वात मोठं जाळं हे अदानींच्या नावावर आहे.
हवाई क्षेत्रातील विमानसेवेत अदानींनी उडी घेतल्यानंतर फायद्यातील विमानतळं त्या उद्योगाला देण्यात आली आहेत. विमान प्राधिकरणाकडे असलेली सातपैकी अशी सहा विमानतळं अदानींच्या ताब्यात आहेत. 16 हजार 700 कोटींच्या खर्चाच्या नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकी अदानींकडे केव्हाच गेली. विमानतळांच्या क्षेत्रात जीव्हीके कंपनी माहीर समजली जायची. या कंपनीकडून विमानतळांचा गल्ला अदानींकडे यावा यासाठी जीव्हीकेच्या कार्यालयांवर तिथल्या बड्या अधिकार्‍यांच्या घरांवर सीबीआय आणि ईडीची छापेमारी सुरू झाली. नको त्या संकटाला तोंड देण्यापेक्षा निमुटपणे या विमानतळांवर जीव्हीकेने पाणी सोडलं.
सिमेंट उद्योगाचंही तसंच. भारतात सर्वाधिक उत्पादन घेणार्‍या एसीसी आणि अंबुजा या दोन्ही उद्योगांचं हस्तांतरण अदानींकडे गेलं आहे. देशातील एकूण बांधकाम क्षेत्रातील 90 टक्के वाटा या दोन सिमेंट उद्योगांकडे आहे. तो आज अदानींकडे आल्याने केव्हा काय होईल, हे सांगता येत नाही. यातच रिअल इस्टेटमध्येही अदानींनी स्वत:ची जागा बनवलीय. सिमेंट उद्योगाचा फायदा इथे मिळेल आणि सरकारी रस्ते आणि इमारती उभारणीतही फायदा करून घेता येईल, हे अदानींनी ताडलंय. रस्ते उभारून टोलद्वारे चांगली कमाई करता येते, हे गुजराती असलेल्या अदानींना कोणी सांगायची आवश्यकता नाही. डौलाने जनसेवा करणार्‍या रेल्वेत अदानी घुसले आणि भारत सरकार त्यांना पावलं.
पाच हजार किलोमीटर लांबीचे देशातील 13 प्रकल्प सध्या अदानींकडून उभारले जात आहेत. त्यासाठी 41 हजार कोटी रुपये खर्ची घातले जात आहेत. टोलच्या उत्पादनात अदानींच्या कमाईचा मोठा वाटा असू शकतो. देशातील फायद्यातील सर्वात मोठा उद्योग म्हणजे बंदरं. देशातील सर्वात मोठं असलेल्या मुंद्रा बंदर हे अदानींच्या मालकीचं आहे. या बंदराच्या जोरावर इतरही बंदरं ताब्यात घेण्याच्या तयारीत अदानी आहेत. देशातील 15 सरकारी बंदरं याआधीच अदानींच्या कब्जात गेलीत. बंदरातील एकूण व्यापारातील 25 टक्के हिस्सा एकट्या अदानींच्या बंदरांच्या नावावर आहे. असे सगळेच उद्योग आज अदानींच्या नावावर असताना अदानी बुडाले तर या उद्योगांचं काय होणार या प्रश्‍नाने देशाची झोप उडाली आहे. मात्र देशाचं काय होईल याची फिकीर भाजपच्या नेत्यांना नाही, हेच चित्र गेल्या काही दिवसांपासूनचं आहे. यावर कहर केला तो पंतप्रधान मोदींच्या संसदेतील बेजार भाषणाने.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 369
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.