Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रिट्स कारमधून सुरू होती गोमांस वाहतूक; पोलिसांच्या पहाटेच्या कारवाईत कारसह साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

रिट्स कारमधून सुरू होती गोमांस वाहतूक; पोलिसांच्या पहाटेच्या कारवाईत कारसह साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
मारुती कंपनीच्या रिट्स कारमधून संगमनेर पोलिसांनी गुरुवारी पहाटे गोमांस पकडले आहे. कारवाई दरम्यान कार चालक फरार झाला. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात पोलीस उपाधीक्षक कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव यांनी फिर्याद दिली आहे.
नाशिक-पुणे महामार्गावर रायतेवाडी गावच्या शिवारात पोलीस पथक वाहनांची तपासणी करत असताना पोलिसांनी पकडलेल्या संशयित रिट्स कारमधून राज्यात गोवंश जनावराच्या कत्तलीस बंदी असताना देखील या आदेशाचे उल्लंघन करून गोमांस वाहतूक होत असल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले.
पोलिसांनी गोवंश जनावरांच्या गोमांस, कारसह साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. कारवाईदरम्यान अंधाराचा फायदा घेऊन कार चालक पसार झाला असल्याचे पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
राज्यात होऊन जनावरांच्या हत्तेस बंदी असली तरी संगमनेरमध्ये मात्र या कायद्याचे उल्लंघन करत सर्रासपणे बेकायदेशीर कत्तलखाने सुरू आहेत. या कत्तलखान्यांमधून राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात गोमांस जात असल्याचे अनेकदा समोर येऊन देखील हे बेकायदेशीर कत्तलखाने बंद करण्यास प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही.
कत्तलखान्यावरील कारवाईचा येथील आकडा देखील राज्यात सर्वात मोठा आहे. असे असले तरी वारंवार कारवाईत तेच तेच आरोपी निष्पन्न झाले असताना देखील या आरोपींवर ठोस कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही. तसेच बहुसंख्य कारवाईत कत्तलखाना चालक पोलिसांना आढळून येत नसल्याने ते पोलीस दप्तरी फरार दाखवले जातात. कत्तलखाना आणि गोमांस वाहतुकीच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडी होत असल्याचा पोलीस प्रशासनावर सातत्याने आरोप होत असतो.
गुरुवारी पहाटेच्या कारवाईत देखील पोलिसांना वाहन चालकास पकडण्यास अपयश आले. त्यामुळे वाहन चालक, वाहन मालक आणि कत्तलखाना चालक, मालकाचा शोध घेऊन पोलीस मुळापर्यंत जाणार का असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 252
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.