Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नव्या राज्यपालांचा शनिवारी शपथविधी; कोश्यारी यांच्याप्रमाणेच बैस यांची झारखंडमधील कारकीर्द वादग्रस्त
राजकारण

नव्या राज्यपालांचा शनिवारी शपथविधी; कोश्यारी यांच्याप्रमाणेच बैस यांची झारखंडमधील कारकीर्द वादग्रस्त

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांचा शपथविधी शनिवारी राजभवनातील दरबार हॉलमध्ये होत आहे. या समारंभात रमेश बैस आपली राज्यपाल पदाची सूत्रे स्वीकारतील. दरम्यान नव्या राज्यपालांकडून महाराष्ट्राचा व महापुरुषांचा सन्मान राखला जावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोश्यारी यांच्याप्रमाणे नव्या राज्यपालांनी दिल्ली सरकारच्या तालावर नाचणारे कळसूत्री बाहुली म्हणून काम पाहू नये, अशी राज्यातील जनतेची अपेक्षा आहे. त्यांची झारखंड मधील कारकीर्द भगतसिंग कोश्यारी यांच्याप्रमाणेच वादग्रस्त राहिली आहे. 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये बैस केंद्रीय राज्य मंत्री होते. 1999 ते 2004 या काळात त्यांनी केंद्रात माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री तसेच रसायने व खते राज्यमंत्री, 2003 मध्ये केंद्रीय खाण मंत्रालयात राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र पदभार, त्यानंतर काही काळ केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. 2009 ते 2014 या काळात ते भाजपचे लोकसभेतील मुख्य प्रतोद होते.
2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीनंतर रमेश बैस यांचे त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 29 जुलै 2019 ते 13 जुलै 2021 या काळात त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम बघितले. त्यानंतर 14 जुलै 2021 पासून त्यांच्याकडे झारखंडच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता त्यांचे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली असून 18 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी ते राज्यपाल पदाची सूत्रे स्वीकारतील.

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी समारंभ 18 फेब्रुवारीला दुपारी 12.40 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये होणार असून तत्पूर्वी 17 फेब्रुवारीला सायंकाळी पावणे सहा वाजता ते मुंबईत येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मान्यवरांसह बैस यांचे मुंबई विमानतळावर त्यांचे स्वागत करतील.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 185
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.