Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बाल कलाकारांच्या शब्दस्वरातून उलगडले गीत रामायण!
सामाजिक

बाल कलाकारांच्या शब्दस्वरातून उलगडले गीत रामायण!

उद्योगपती राजेश मालपाणी अभिष्टचिंतन सोहळा; सरस रचनांनी रसिक मंत्रमुग्ध
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/02/2023Updated:18/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
default
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर
लहान मुलांचा बहारदार गायन अविष्कार, रामभक्तीच्या साद घालणार्‍या रचना, गीत गायन-निवेदनातून उलगडणारे रामचरित्र आणि भावभक्तीच्या या सोहळ्यात देहभान हरपून तल्लीन झालेला हजारोंच्या संख्येतील रसिक प्रेक्षक असा माहोल शुक्रवारी संगमनेरच्या जाणता राजा मैदानाने अनुभवला. झी वाहिनीवरील सारेगमप फेम सारंग भालके आणि ध्रुव ग्लोबल स्कूलच्या बाल वाद्यवृंदाचा कलाविष्कार आणि शब्दस्वरांचा अनमोल नजराणा रसिकांसाठी वेगळी आनंदानुभूती देणारा ठरला.

उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त संगमनेरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी लिटिलचॅम्प सारंग भालके याच्यासह ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ग. दी. माडगूळकर लिखित व सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायणातील 56 गीतांमधील आठ भावगीतांचे सादरीकरण करीत उपस्थित हजारों प्रेक्षकांना रामराज्याची सफर घडवली.

सुरेल आवाज आणि त्याला साजेशा संगीताची जोड यातून साकारलेल्या ‘दशरथा घे हे पायस दान, राम जन्मला गं सखी राम जन्मला, स्वयंवर झाले सीतेचे, नकोस नौके परत फिरु..’ अशा एकामागून एक सरस रचना आणि प्रत्येक गीतापूर्वी डॉ. संजय मालपाणी यांनी बहारदार निवेदनातून उलगडलेली पार्श्‍वभूमी यामुळे हा कार्यक्रम अतिशय उंचीवर जावून पोहोचला होता. गीत रामायणाच्या प्रारंभी ध्रुव ग्लोबल स्कूलच्या योगासनपटूंनी सादर केलेल्या सामूहिक योगासन नृत्यातून उपस्थित रसिकांना भक्ती आणि शक्तीचा अनोखा मिलाफही यावेळी अनुभवायला मिळाला.

शुक्रवारपासून सलग चार दिवस संगमनेरातील जाणता राजा मैदानावर होत असलेल्या या सोहळ्यात शनिवार व रविवारी प्रसिद्ध हिंदी कवी, लेखक व साहित्यिक डॉ. कुमार विश्‍वास यांचा तुफान लोकप्रिय ठरलेला ‘अपने अपने राम’ या भावस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी ध्रुव ग्लोबल स्कूलच्या तिनशे विद्यार्थ्यांकडून वाल्मीकी रामायणातील विविध प्रसंगांना एका माळेत गुंफून साकारलेल्या ‘रामायण’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सुमारे 25 हजार प्रेक्षकांच्या बसण्याची सुसज्ज व्यवस्था, वाहनांसाठी जाणता राजा मैदानाकडे येणार्‍या प्रत्येक रस्त्यावर उभारलेले वाहनतळ, कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेले श्रीराम-लक्ष्मण व सीतामातेच्या आकर्षक प्रतिमा असलेले मंदिर, संपूर्ण कार्यक्रमस्थळ व वाहनतळावर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर, उत्कृष्ट ध्वनी व प्रकाश योजना, पाठीमागे बसलेल्या प्रेक्षकांना मंचावरील प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे दिसावी यासाठी मोठ्या एलईडी पडद्याची सोय याशिवाय जाणता राजा मैदानाच्या परिसरात सुरक्षेची परिपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.  शुक्रवार ते सोमवार अशा सलग चार दिवस सादर होणार्‍या या सर्व कार्यक्रमांना प्रवेश खुला आहे.

शुक्रवारी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पार्श्‍वगायक कैलास खेर यांच्या ‘कैलासा’ या भावगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र दिल्लीहून येणारे त्यांचे विमान चुकल्याने व नंतरचे विमान उशिरा पोहोचणारे असल्याने ऐनवेळी त्यांचा कार्यक्रम रद्द झाला. त्यामुळे जाणता राजा मैदानात जमलेल्या हजारों रसिकांची निराशा टाळण्यासाठी ऐनवेळी सारंग भालके आणि ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘गीत रामायणा’ने कैलास खेर यांची उणीव भरुन काढल्याची भावना कार्यक्रमानंतर रसिकांच्या चेहर्‍यावर दिसून आली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 231
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.