Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कवी दिनकर साळवे स्मृति पुरस्कार प्रा. गंगाधर अहिरे यांना जाहीर; १२ मार्चला संगमनेरमध्ये पुरस्कार वितरण
महाराष्ट्र संवाद विशेष

कवी दिनकर साळवे स्मृति पुरस्कार प्रा. गंगाधर अहिरे यांना जाहीर; १२ मार्चला संगमनेरमध्ये पुरस्कार वितरण

गतवर्षी शेवगाव येथील लेखक आणि वंचितचे नेते प्राध्यापक किसन चव्हाण यांना केले होते सन्मानित
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/02/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
नाशिक येथील ज्येष्ठ साहित्यिक कार्यकर्ते प्रा. गंगाधर अहिरे यांना यावर्षीचा स्मृतीशेष कवी दिनकर साळवे स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती पुरस्कार समितीचे अध्यक्ष के. जी. भालेराव यांनी दिली.
रविवारी १२ मार्चला संगमनेरच्या व्यापारी असोसिएशन सभागृहामध्ये समीक्षक प्रा. मिलिंद कसबे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असून माजी आमदार डॉ. सुधीर तांबे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

संगमनेरमधील ज्येष्ठ लेखक समीक्षक स्मृतीशेष कवी दिनकर साळवे स्मृती पुरस्कार गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आला आहे. गतवर्षी हा पुरस्कार शेवगाव येथील लेखक आणि वंचितचे नेते प्राध्यापक किसन चव्हाण यांना देण्यात आला होता. दुसऱ्या वर्षीच्या पुरस्कारासाठी प्रा. अहिरे यांची निवड करण्यात आली आहे.

प्रा. गंगाधर अहिरे हे कवी, लेखक, संपादक व प्रख्यात व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच ते पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते, नेते व उत्कृष्ट संघटक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांचे सीमा सरकताहेत (कविता संग्रह), समता संगराची पन्नास वर्षे (वैचारिक संपादित ग्रंथ), कवी अरुण काळे व्यक्ती व वाड्मय (संपादित ग्रंथ), उभा माणूस पेटवा (लोककला, लोकगीतांच्या भाष्य), वादळाचे शिलेदार (व्यक्तिचित्रण), उजेडाचा जागर (वैचारिक लेखांचे पुस्तक), चिंतनाच्या तळाशी (समीक्षात्मक लेखन), कोयना:सर्प काळातील काही कविता (संपादित प्रातिनिधिक कविता संग्रह) आदी साहित्य प्रसिद्ध आहे.

त्यांना नाशिक महानगर पालिकेचा लोककल्याण पुरस्कार, कोकणातील दर्पण पुरस्कार, वाड्मय सेवा पुरस्कार, नगरचा कॉम्रेड अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. परिवर्त त्रैमासिकाचे ते संपादक आहेत. परिवर्त साहित्य संमेलनेही त्यांच्या पुढाकाराने होत आहेत. परिवर्त बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व नाशिकरोड येथील महात्मा फुले वाचनालयाचे ते विश्वस्त आहेत.

पुरस्कार समितीचे अध्यक्ष के. जी. भालेराव, संदीप वाकचौरे, प्रा. राहूल हांडे यांनी या पुस्तकाची घोषणा केली आहे. पुरस्कार समितीचे सूर्यकांत शिंदे, गौतमराव मिसाळ, पोपटराव सोनवणे, सचिन साळवे, बंटी यादव, विनोद गायकवाड, जिजाबाई हासे, सुखदेव मोहिते कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 243
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.