महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई :
नोकरीसाठी इच्छुक असलेल्या करिता शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने या संदर्भातील आदेश देखील काढला आहे. कोरोना संकटामुळे दोन वर्ष नोकर भरतीची जाहिरात निघाली नाही. त्यामुळे वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना नोकर भरतीसाठी अर्ज करता येत नव्हता. या नोकर भरतीसाठी वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांनी दोन वर्ष वाढवून देण्याची मागणी केलेली विद्यार्थ्यांची ही मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे.
नासिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या सभागृहातील पहिल्याच भाषणात या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. सरळ सेवेत भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये भरतीसाठी वयोमर्यादेत आता सरकारकडून दोन वर्ष वाढवून देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात लाखो विद्यार्थ्यांची सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. ते सरकारी नोकरी मिळवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतात. अनेकांना त्यामध्ये यश मिळतं. तर काहींना त्यात लवकर यश मिळत नाही. त्यामुळे ते प्रत्येक नोकर भरतीला प्रयत्न करतात. या दरम्यान काहींची वयोमर्यादा संपते. कारण नोकर भरतीच्या निकषांमध्ये वयाचीदेखील अट असते.
वयोमर्यादाच्या अटीमुळे काहींना परीक्षा देण्यापासून मुकावं लागतं. या अटीमुळे लॉकडाऊननंतर अनेकांना फटका बसला. कारण कोरोना संकट काळात लॉकडाऊनमुळे दोन वर्ष नोकर भरती रखडली. त्यानंतर जाहीर झालेल्या नोकर भरतीला अर्ज करण्यापासून काही विद्यार्थ्यांना मुकावं लागलं. याच गोष्टीचा विचार करत राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला. त्यामुळे वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना सरळसेवा भरतीसाठी दिलासा मिळाला आहे.

