Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कसबा पेठ निवडणुकीनंतर अजित पवारांनी पाथर्डीत आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिला हा सल्ला…
राजकारण

कसबा पेठ निवडणुकीनंतर अजित पवारांनी पाथर्डीत आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिला हा सल्ला…

कोणी काही सांगितले तर आम्ही ऐकायचो, ह्यांना लगेच राग येतो
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/03/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर : कुटुंब म्हटलं की भांड्याला भांड लागतंच. पण आपण एकत्र लढलो तर निश्चितचं त्यांचा पराभव करु. कसबापेठ मतदारसंघात गेली २५ वर्षे भाजपचा उमेदवार निवडून येत होता. आता जनता त्यांना त्यांच्याच मतदारसंघात नाकारत आहे. त्यामुळे आपल्याला एकत्र होऊनच निवडणुका जिंकायच्या आहेत. तरीदेखील कसबा जिंकलो म्हणून हुरळून जाऊ नका. आपल्याला जनतेसोबत खांद्याला खांदा लावून काम करायच आहे, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिला.

जिल्हा बँक अध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार मंगळवारी अहमदनगरमध्ये आले होते. तत्पूर्वी त्यांनी पाथर्डी येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

अजित पवार म्हणाले, कोणी ताम्रपत्र घेऊन जन्माला येत नाही. आम्ही आलो नाही. जे आता सत्तेत आहेत तेही ताम्रपत्र घेऊन जन्माला आलेले नाहीत. त्यामुळे जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. आपण मात्र समंजसपणाची भूमिका घ्यायला हवी. शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. सत्ताधारी मात्र करु, एवढंच आश्वासन देतात.

पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळे जोशाने कामाला लागण्याचा सल्ला सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. ते जोशाने काम करणार मग, आम्ही कसे काम करणार. असा सवाल करीत आम्हीही जोशानेच काम करणार ना, असे त्यांनी म्हटले.

एसटी सुरु नव्हती तेव्हा आम्ही वाहक चालकांचे पगार काढले आहेत. महाराष्ट्राच्या तिजोरीवर आर्थिक बोजा टाकून आम्ही एसटीच्या वाहक चालकांना पगार दिले. आताच्या सरकारची मात्र जाहिरातींवर उधळपट्टी सुरु आहे. वेतन मिळाले नाही म्हणून एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. तर सरकारकडून एसटीवर जाहिरात करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत.

खराब एसटीवर ह्यांची जाहिरात आहे. खराब एसटीवर जाहिरात असल्याचे मी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी खराब एसटीवर जाहिरात लावणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित केले. मीही अनेक वर्षे सत्तेत होतो. कोणी काही सांगितले तर आम्ही ऐकायचो. ह्यांना लगेच राग येतो. ज्या अधिकाऱ्यांना निलंबित केले. त्याचे कुटुंब माझ्या नावानेच बोंबा मारत असेल ना. नंतर मी पुन्हा मंत्र्यांना भेटलो आणि अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची सुचना केली. एवढा राग बरा नाही, असा टोला अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 210
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.