Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सावरकर श्रेष्ठ की छत्रपती?
विश्लेषण

सावरकर श्रेष्ठ की छत्रपती?

लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक आहेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/04/2023No Comments5 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार विशेष ○ प्रवीण पुरो
सावरकरांच्या नावाने राजकारण करणाऱ्या भाजपेयींचा शिवरायांवरील प्रेमाचा उमाळा कमालीचा आगलावा ठरला आहे. सावरकरांच्या बदनामीच्या निषेधार्थ गौरव यात्रेची घोषणा करणाऱ्या या पक्षाला छत्रपतींची बदनामी चालली. त्यांच्या गौरवार्थ यात्रा काढावीशी वाटली नाही. यावरून या मंडळींचा हेतू किती कलुषित आहे हे स्पष्ट होतं.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची गेल्या आठवड्यात एक पत्रकार परिषद होती. अदानीच्या संकटातही राज्यातील वाढत्या उद्योगाची स्थिती सांगण्यासाठी ते पत्रकारांना माहिती देत असावेत, असं वाटल्याने सर्वच जण या पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होते. पण अदानींच्या उद्योगाऐवजी सावरकरांचं तुणतुणं वाजवण्याच्या त्यांच्या या पत्रकार परिषदेने सगळेच आश्‍चर्य व्यक्त करत होते. राज्य सरकारच्या सावरकर गौरव यात्रेची भलामण करता करता त्यांनी अर्थातच राहुल गांधींचा निषेध करून टाकला. सामंत हे आपल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाची री ओढण्यासाठी सारा खटाटोप करत होते, हे एव्हाना सर्वांच्याच लक्षात आलं होतं. तेव्हा उपस्थित पत्रकारांनी त्यांना चांगलंच घेरलं आणि राज्यासाठी आणि देशासाठी श्रेष्ठ कोण? हिंदवी स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवराय की सावरकर, असा एकच प्रश्‍न केला आणि सामंत गडबडले.

ज्या सावरकरांच्या नावाने सरकार गौरवयात्रेचं निमित्त करतेय त्या सावरकरांच्या व्यक्तीरेखेविषयी सरकारचं मत काय, त्यांनी छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आपल्या पुस्तकात व्यक्त केलेली मतं आणि एकूणच धार्मिक मांडणीत त्यांनी इतर धर्मियांविषयी मांडलेले विचार हे व्यवस्था म्हणून सरकार स्वीकारणार आहे काय, असा साधा प्रश्‍न पत्रकारांनी सामंतांना विचारला. तसं नसेल तर ज्या छत्रपतींविषयी, संभाजी महाराजांविषयी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या विचारवंतांविषयी मांडलेल्या मतांचं करायचं काय? सावरकरांचं पालकत्व घेऊन महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींची बाबासाहेबांच्या अनुयायांची शिंदे-फडणवीसांचं सरकार माफी मागणार काय? हे साधे प्रश्‍न पत्रकारांचे होते.

यातल्या एकाही प्रश्‍नावर उत्तर देणं सामंत यांना शक्य नव्हतं. त्यांनी नेहमीप्रमाणे सारवासारव केली आणि मुळ मुद्यावरून पळ काढला. हेतू अप्रामाणिक असला की जी फजिती होते तशीच ती सामंतांची झाली. सावरकरांच्या नावाने राज्यातलं सरकार राजकारण करत आहे, हे एव्हाना राज्यातील जनतेला कळून चुकलंय. यामुळे असले मुद्दे घेऊन लोकांना उल्लू बनवण्याचे उद्योग कोणी करू नयेत.

राहुल गांधी यांनी केंब्रिज युनिव्हर्सिटीत देशातील लोकशाहीच्या घातक अवस्थेबाबत व्यक्त केलेल्या मतांनंतर त्यांनी देशाची माफी मागावी, भाजपने देशाची संसद अडवून ठेवली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि जगभर हाह:कार माजवलेल्या अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांचे संबंध काय आहेत, इतक्याशा प्रश्‍नाला उत्तर देता देता थकून गेलेल्या भाजपच्या नेत्यांना राहुल यांनी केंब्रिज विद्यापीठात व्यक्त केलेल्या मतांचा आधार घेत संसद बंद करत माफीची मागणी केली. राहुल यांनी पत्रकार परिषद घेऊन मी सावरकर नाही, असं सांगितलं. राहुल यांनी सावरकर यांचंच नाव का घेतलं इतरांची नावं का घेतली नाही, या एका प्रश्‍नातून या प्रश्‍नाचं उत्तर मिळतं.

सावरकरांच्या नावाचं राजकारण करणार्‍यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. केंब्रिजमध्ये राहुल यांनी कोणा व्यक्तीविषयी वा राजकीय पक्षाविषयी मत व्यक्त न करता भारतातील लोकशाहीच्या अवस्थेबाबत टिपण्णी केली आहे. आजकाल देशातील लोकशाही धोक्यात आहे, हे देशातील सामान्यातला सामान्य माणूस सांगू लागला आहे. एकट्या अदानींच्या प्रेमाने तर मोदी, शहा आणि त्यांच्या सरकारने राबवू घातलेली ठोकशाही कोणत्या थराला गेली आहे, हे भारतातील जनतेला चांगलंच कळू लागलं आहे. या पार्श्‍वभूमीवर राहुल यांनी व्यक्त केलेलं मत अगदीच गैर होतं असं अजिबात नाही.

केंब्रिजमध्ये व्यक्त झालेल्या राहूल यांच्याहून कितीतरी पटीने घाणेरड्या भाषेचा अवलंब करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची येथेच्छ बदनामी करत विदेशात टाळ्या मिळवल्या होत्या. भारताविषयी प्रेम असलेली कोणीही व्यक्ती इतक्या खालच्या पातळीवर येऊ शकत नाही. आणि देशाविषयी तर नाहीच नाही. इथे मोदींनी केलेली टीका चालते पण इतरांनी नाही, हा दांभिकपणा झाला. या देशात जन्मलो याची लाज वाटते, असं सांगणारी व्यक्ती स्वत: चार टर्म गुजरातची मुख्यमंत्री होती, हे विशेष. तेव्हा मोदींना देशात राहण्याची लाज वाटत नसेल तर इतरांनी लाज काय म्हणून बाळगावी?

राहुल यांनी सावरकर यांचं नाव घेत मी माफीवीर नाही, म्हटल्याचं निमित्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं. स्वतंत्र्य संग्रामातील सावरकर यांच्या योगदानाविषयी अनेक मतांतरं आहेत. त्यांच्यावरील गुन्ह्यांचा गैरफायदा घेत इंग्रजांनी कदाचित त्यांना माफी मागायला लावलीही असेल. पण त्यांच्याबरोबरील इतर सुमारे अडीचशे स्वातंत्र्यवीरांना एकाकी टाकून एक स्वातंत्र्यवीर परत येतो. इतर कोलू ओढतच आपलं जीवन संपवतात याचा अर्थ न समजण्याइतकी जनता भोळी नाही. सावरकर यांनी राज्यातील श्रेष्ठ पुरुषांच्या आणि समाजसुधारकांविषयी व्यक्त केलेल्या मतांचं काय करायचं? छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज आदींच्या विषयी विखारी मतं मांडणार्‍या सावरकर यांच्याशी सरकार सहमत असेल तर त्यांनी तसं जाहीर करून टाकलं पाहिजे.

महाराष्ट्र आणि देशासाठी सर्वश्रेष्ठ कोण हा सामान्य माणसाला पडलेला प्रश्‍न सरकारच्या गळ्यातील हाड बनलाय. कारण राजकारण करण्यासाठी छत्रपतींचं नाव घेण्याची लायकी भाजपने केव्हाच गमावली आहे. पंढरपूरच्या प्रशांत परिचारकापासून ते दिल्लीत बसलेल्या गौरव भाटीया या मूर्ख प्रवक्त्यांपर्यंत सगळ्यांनीच छत्रपतींची यथेच्छ बदनामी केली. इतकं करूनही भाजपने त्यांचा साधा केस वाकडा केला नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी या राज्यपालाच्या छत्रपतींविषयीच्या अश्‍लाघ्य वक्तव्याने सारा महाराष्ट्र चवताळून उठला. जगाला ज्ञान पाजणारे भाजपचे बोलघेवडे तेव्हा थोबाड लपवत होते.

आता सावरकरांचा मुद्दा आल्यावर पुन्हा भावनेचं राजकारण सुरू झालं. त्यांना सावरकर गौरवयात्रा लागली आहे. एखाद्या मुद्याचं राजकारण कसं करायचं, हे भाजपकडून शिकावं. राजकारण करताना त्याचे फासे कसे उलटे फिरतील, याची तमा ते बाळगत नाहीत. छत्रपती ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. तर सावरकर ही भाजपची संधीसाधू भूमिका आहे. सर्वच स्तरावर सरकारविषयी प्रचंड राग असल्याने कोणत्याही स्थितीत लोकांचं लक्ष इतरत्र वळवण्यासाठी भाजप कोणतंही निमित्त करू शकतं. आता पुलवामा, पठाणकोट वा उरीचा हल्ला करता येणार नाही. सावरकरांसारखे मुद्दे उपस्थित केल्याविना कोणी विचारणार नाही, याची जाणीव या मंडळींना आहे. यासाठी भावनेला हात घालणार्‍या घटनाच आवश्यक आहेत, हे भाजपच्या नेत्यांना चांगलं ठावूक आहे. आणि सावरकर हा भाजपसाठी कळीचा मुद्दा आहे.

हे निमित्त पुढे करून राजकरण करणं त्यांना शक्य आहे. अंदमानचं निमित्त करायचं आणि सावरकरांच्या नावाने आपल्या पोळ्या भाजून घ्यायच्या या उद्योगाचा आता लोकांनाही उबग आला आहे. एकट्या सावरकरांच्या यातनांचा बाजार करणार्‍या भाजपच्या नेत्यांना सावरकरांबरोबरच्या सुमारे दोनशेहून अधिक स्वातंत्र्यवीरांचा विसर कसा काय पडला? असंख्य यातना भोगून त्यांनी देशासाठी आपलं बलिदान दिलं. इंग्रजांपुढे मान तुकवली नाही, हा त्यांचा दोष?

सावरकर मुद्याचं राजकारण करताना भाजपसाठी श्रेष्ठ कोण, हे त्या पक्षाने आणि शिंदे सरकारने जाहीर केलं पाहिजे. ज्या छत्रपतींच्या नावे आपण मतं मागतो, ज्या छत्रपतींचं नाव घेऊन राज्य कारभार करतो, त्या छत्रपतींविषयी कोणीही काहीही बरळावं आणि ते भाजपने ऐकून घ्यावं, इतके छत्रपती लहान होते? सावरकर छत्रपती शिवरायांना, छत्रपती संभाजी राजांना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आणि महात्मा ज्योतिबा फुले या समाजसुधारकांना इतक्या खालच्या पातळीतील समजायचे की त्यांची करावी तितकी निर्भत्सना कमीच आहे. दुर्दैव वाटतं ते उध्दव ठाकरे यांचं. कठीण परिस्थितीत ठाकरेंची कृती बिनकण्याची असते. निवडणुकीच्या राजकारणात होणार्‍या नुकसानीची भीती बाळगून ठाकरे सावरकरांची टिमकी वाजवत असतील, तर छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याचा त्यांनाही अधिकार नाही, याची त्यांनी जाणीव ठेवावी.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 342
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

30/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

By Annant Ppangarkar18/10/20260

प्रवीण पुरो- भारतीय संविधानाने घटनात्मक अधिकार दिलेल्या कोणत्याही संस्थेवर पक्षपातीपणाचा वा राजकीय वरदहस्ताचा आरोप झाला,…

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.