Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मित्राचा खून केल्याच्या कारणावरून संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला सुनावली ही मोठी शिक्षा
न्यायालय

मित्राचा खून केल्याच्या कारणावरून संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला सुनावली ही मोठी शिक्षा

फेब्रुवारी 2022 मध्ये अकोले येथे घडली होती घटना, 14 महिन्यातच न्यायालयाने दिला निर्णय
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/04/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज
मित्राचा खून केल्याच्या कारणावरून न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला भा.द.वि. कलम 304 (पार्ट सेकंड) खाली दोषी ठरवत वीस हजार रुपये दंडासह दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. शंकर लहानू साळुंखे, रा. कळस, ता. अकोले, जि. अहमदनगर असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

3 फेब्रुवारी 2022 रोजी देवठाण रोड अकोले येथे खुनाची घटना घडली होती. सुतार व्यवसाय करणाऱ्या सरबजीत ओमप्रकाश चौहान (रा. उत्तर प्रदेश) याच्या खून प्रकरणी राजू जगधारी राजभर याच्या तक्रारीवरून अकोले पोलीस ठाण्यात आरोपी शंकर लहानु साळुंखे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात अधिक माहिती अशी, 3 फेब्रुवारी 2022 च्या रात्री आठ वाजता फिर्यादी आणि आरोपींनी एकत्रित जेवन केल्यानंतर त्यांच्यात वाद झाले. त्यामुळे फिर्यादीने आरोपीला सांगितले की, ‘तू तुझ्या घरी जा आणि मी माझ्या घरी जातो’ असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपी साळुंखे याने फिर्यादीला लाथा बुक्क्याने मारहाण केली यात फिर्यादीला मुका मार लागला होता.

त्यामुळे फिर्यादीने तेथून जवळच राहत असलेल्या त्याच्या मित्राला सरबजीत ओमप्रकाश चौहान याला बोलावून घेत मारहाणीची माहिती दिली. त्यामुळे चौहान याने आरोपी साळुंखे याला याबद्दल विचारणा केली. त्यानंतर साळुंखे हा तेथून निघून गेला आणि थोड्यावेळाने त्याच्या पत्नीला घेऊन फिर्यादीच्या चहाच्या दुकानावर आला. तेथे त्याने चौहान याला तू मला मारहाण केली, मी तुला आता सोडणार नाही असे म्हणत जवळच पडलेल्या लाकडी दांडक्याने चौहान याला मारहाण करत त्याला गंभीर जखमी केले. जखमी चौहान याच्यावर सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला घरी सोडले असता दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृत्यू झालेला होता.

त्यामुळे या संदर्भात अकोले पोलीस ठाण्यात आरोपी साळुंखे यांच्या विरोधात खुणासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी या प्रकरणी तपास करत आरोपी विरोधात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल केले होते. न्यायाधीश वाय. एच. आमेटा यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी सरकार पक्षाच्यावतीने या खटल्यातील काही महत्त्वाच्या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्या साक्षी या खटल्यात महत्त्वाच्या ठरल्या.

सरकार आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद लक्षात घेत न्यायाधीश वाय. एच. आमेटा यांनी आरोपीला भादवि कलम 304 (सेकंड पार्ट) खाली दोषी ठरवत वीस हजार रुपये दंडाचे आणि दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,032
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.