Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » BigBreaking निळवंडे धरण आणि कालव्याचे उद्घाटन सवडीने करा; आधी हक्काचे दहा टीएमसी पाणी दुष्काळी भागाला द्या: माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची मागणी
महाराष्ट्र संवाद विशेष

BigBreaking निळवंडे धरण आणि कालव्याचे उद्घाटन सवडीने करा; आधी हक्काचे दहा टीएमसी पाणी दुष्काळी भागाला द्या: माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले खरमरीत पत्र
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर: अनंत पांगारकर

(महाराष्ट्र संवाद न्यूज)

सूर्य डोक्यावर आग ओकत असताना निळवंडेचे पाणी देखील तापले आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहिले असून यात पंतप्रधानांची वेळ मिळाल्यावर सवडीने निळवंडे धरण व कालव्याचे उद्घाटन करा, आधी कालव्यांद्वारे दुष्काळी भागातील जनतेला पाणी द्या. अशी मागणी केली आहे.

थोरात यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दहा टीएमसी पाण्याची उपलब्धता असताना, दुष्काळी भागाला हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवू नका, जनतेच्या मनात सरकार बद्दल प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. जनतेच्या उद्रेकाची वाट पाहू नका. त्यांना त्यांच्या हक्काचे पाणी देण्याचे पुण्यकर्म सरकारने पार पाडावे.

विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निळवंडे च्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागितलेली आहे मात्र ती मिळत नसताना धरणात असलेला पाणीसाठा लाभार्थ्यांना अद्यापही मिळू शकलेला नाही या पार्श्वभूमीवर थोरात यांनी घेतलेली स्पष्ट भूमिका चांगलीच चर्चेत आली आहे. थोरात यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना लिहिलेले पत्र समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या वाचकांसाठी थोरात यांनी लिहिलेले पत्र जसेच्या तसे देत आहोत.

माननीय महोदय,

अत्यंत तातडीच्या विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. दुष्काळी भागाला नजरेसमोर ठेवून निळवंडे धरण आणि कालव्यांचे काम करण्यात आलेले आहे. सध्या निळवंडे व भंडारदरा धरणातून किमान दहा टीएमसी पाणी आपण दुष्काळी भागाला देऊ शकतो, मात्र केवळ आदरणीय पंतप्रधान महोदयांची उद्घाटनासाठी वेळ मिळत नाही म्हणून या हक्काच्या पाण्यापासून दुष्काळी भागातील जनता वंचित राहिलेली आहे.

निळवंडे धरण आणि डाव्या कालव्याचे काम यापूर्वीच पूर्ण झालेले आहे. आपले सरकार आल्यानंतर उजव्या कालव्याचे काम रखडलेले आहे. त्याला अपेक्षित गती मिळताना दिसत नाही. उन्हाळा सुरू झालेला आहे. शिवाय मान्सूनला आता अल निनोचा धोका आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. सरकारलाही या भविष्यकालीन दुष्काळाची तीव्रता माहित आहे. त्यामुळे दुष्काळी भागाचे हक्काचे दहा टीएमसी पाणी लाभक्षेत्रातील बांधवांना मिळणे अत्यावश्यक आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर या पाण्याचा दुष्काळी भागातील शेतकरी बांधवांना उपयोग होणार नाही. आपण तातडीने दुष्काळी भागाला पाणी द्यावे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना माहीत आहे. धरणांमध्ये पाणी असतानाही लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही, त्यामुळे जनतेच्या मनात सरकार बद्दल प्रचंड रोष आहे. जनतेच्या मनातली ही भावना आपण समजून घ्यावी. हवेतर नंतर सवडीनुसार आदरणीय पंतप्रधानांना बोलवावे, उद्घाटनाचा मोठा कार्यक्रम करावा त्याला आमची अजिबात हरकत नाही. मात्र हक्काचे दहा टीएमसी पाणी हे त्वरित दुष्काळी भागातील जनतेला देण्याचे पुण्यकर्म आपण करावे, अशी आपणास विनंती करतो.

आपला

(बाळासाहेब थोरात)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,099
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
क्रिडा व कला

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जयहिंद लोकचळवळीच्या…

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

07/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.