Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जोर्वेनाका हाणामारी प्रकरणी आत्तापर्यंत 20 आरोपी अटकेत; पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरूच! आरोपींची कोठडीत रवानगी
गुन्हेगारी

जोर्वेनाका हाणामारी प्रकरणी आत्तापर्यंत 20 आरोपी अटकेत; पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरूच! आरोपींची कोठडीत रवानगी

अशी आहेत पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/05/2023Updated:31/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर: शहरातील नासिक-पुणे महामार्गावर असलेल्या जोर्वे नाका येथे रविवारी रात्री झालेल्या हाणामारी आणि दंगल प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या वीसवर गेली आहे. यातील सोळा आरोपींना मंगळवारी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर उर्वरित आरोपींना न्यायालयाने बुधवारी पाच जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

रविवारी रात्री जोर्वे नाका येथे झालेल्या वादातून काही नागरिकांवर प्राणघात हल्ल्याचा प्रयत्न झाला. धारदार शस्त्राचा वापर करत दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला. गुन्हेगारांनी थेट कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देत अशांतता निर्माण केल्याने पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. यामुळे शहरातील व परिसरातील ग्रामीण भागातील गावांमध्ये तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलीस यंत्रणेने वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

या प्रकाराची राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय पातळीवरून देखील गंभीर दखल घेण्यात आली. त्यामुळे संगमनेरमध्ये नासिक परिक्षेत्राचे आयजी बी. जी. शेखर, अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संगमनेरमध्ये ठाण मांडले होते. राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक शहरात पाचरण करण्यात आले.

याशिवाय अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे निरीक्षक भगवान मथुरे यांनी शहराच्या वादग्रस्त भागात धडक कारवाई करत सुरुवातीला सोळा आणि मंगळवारी रात्री आणखी चौघा आरोपींना पकडले. तसेच नगरपरिषदेच्या मदतीने वादाला कारणीभूत ठरलेले अतिक्रमण देखील हटवून हा संपूर्ण परिसर अतिक्रमण मुक्त केल्याने पोलीस कारवाईचे स्वागत होत आहे.

पोलिसांनी आत्तापर्यंत अटक केलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे… 

नईम कादर शेख, रेहान गुलफान पठाण, शेहबाज याकूब शेख, मोबीन मुबारक शेख, नफीस अनिस पठाण, अमीर रफिक शेख, इम्रान उस्मान पठाण, तौफिक शफिक शेख इस्माईल निसार पठाण, अबुजर बिलाल शेख, अलताफ मुस्तफा अन्सारी, सलमान साजिद शेख, अमजद गुलामनबी शेख, शकील नासीर पठाण, शेहबाज गफार शेख व अहद सय्यद आद अन्सार यांना मंगळवारी अटक करण्यात आली. सरकारी वकील मिराज पर्बत यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना 2 जुनपर्यंत तर बुधवारी रात्री अरबाज करीम शेख, कासिफ असद कुरेशी, हजेब शब्बीर शेख व फैसल महमद शेख या चौघांना अटक केली असून बुधवारी त्यांना न्यायालयासमोर नेण्यात आले. न्यायालयाने त्यांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,202
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.