Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने संगमनेरात शेतकऱ्यांचा दीड तासांचा महामार्ग रोको मागे शासकीय बफर स्टॉकमधून युरिया मिळताच आंदोलन स्थगनावर शिक्कामोर्तब; लिंकिंग आणि ढिसाळ नियोजनावरून महायुती सरकारवर कडाडून टीका

July 21, 2026

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; संगमनेरमध्ये प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

July 21, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आजीचा परीसस्पर्श..!
महाराष्ट्र संवाद विशेष

आजीचा परीसस्पर्श..!

सकारात्मक विचार
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 2, 2023Updated:June 2, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

आज सकाळी किरकोळ कारणाने बायकोशी कटकट झाली, वैतागून दवाखान्यात आलो होतो. ओपीडी मध्ये नर्सने एक केसपेपर आत आणून दिला.

पेशंटचं नाव वाचलं, पुढे वय लिहिलं होतं…१०३ वर्षे! मी सिस्टरला आत बोलवून ‘नीट वय विचारत जा!’ असं म्हणालो. “सर, त्याहून जास्ती असेल असं घरचे म्हणताहेत” ती म्हणाली.

मी खुर्चीवरून उठून पलीकडे गेलो. टेबलावर कृश, छोटीशी आजी, अबोली रंगाची साधीशी नऊवारी नेसलेली, सुरकुत्याने भरलेला चेहरा, तोंडचं बोळकं, चेहऱ्यावर मिश्किल हसू..

ऐकायचा प्रॉब्लेम असेल असं उगाच गृहीत धरून मी बरोबर उभ्या असलेल्या सुनेला ‘काय होतंय” असं विचारलं. ती काही सांगणार इतक्यात “मला इचारा, मी सांगते की” आजी हसून म्हणाली.

“मला वाटलं ऐकायला येत नसेल!” मी हसून म्हणालो.

“बीपी न्हाय, साखर नाय, ऐकाया येतं, बिना आधाराचं चालता येतं, शिरीयल बगते, सुईत धागा ववते. वाईच पाठ दुखती बगा” आजी माझी फिरकी घेत म्हणाली.

मी आजीला तपासलं. तपासताना सगळ्या सूचना नीट ऐकून आजी सहकार्य करत होती! एक्सरे झाला, एक्सरे नातेवाईकांना समजावून सांगितलंस, गोळ्या लिहून दिल्या. ते निघाले.

सिस्टर आत आली. “सर,आजींना तुमच्याशी दोन मिनिटे बोलायचं आहे”.

सुनांच्या पाठोपाठ आजी आत आली, मी खुर्चीतून उठून उभा राहिलो, आजीजवळ गेलो.

आजीने थरथरत्या, सुरकुतलेल्या हातांनी माझा हात धरला आणि माझ्याकडे बघून गोड हसली. तिच्या डोळ्यांत पाणी आलं होतं.

“काही विचारायचं होतं का?” मी.

“काय नाय आले तुमाला भेटायला जाता जाता… चांगला पोरगा हाय तू!” आजी म्हणाली. मला एकदम गहिवरून आलं.

माझ्या समोरच्या खुर्चीवर बसलेली बायको सगळं पाहत-ऐकत होती. मी तिच्याकडे पाहिलं.

आजी हळूहळू चालत बाहेर गेली. त्या स्पर्शाने, आयुष्याकडे बघण्याची ती सकारात्मक वृत्ती, ते निरागस हास्य….माझ्याच नकळत मी बायकोकडे पाहून हसलो…

खराब म्हणून आपणच सुरू केलेला दिवस असतो, योगायोगाने एखादे दिवशी असा परिसस्पर्श होतो, पण नेहमीच असं कोणी भेटेल असंही नाही. आपल्यालाच स्वतःहून “झालेलं सोडून द्यायला” शिकायला जमायला हवं..

भरपूर वर्षे जगावं असं वाटतं आपल्या सर्वांनाच.. पण “भरपूर वर्षे छान, निरोगी, सकारात्मक जगावं” असं आज ती आजी शिकवून गेली खरी.!

डॉ. अमित बिडवे

अस्थिरोग तज्ञ, लेखक

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 747
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; संगमनेरमध्ये प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

July 21, 2026

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026

भाकरीच्या भुकेने आणि जगण्याच्या वेदनेतून निर्माण झालेले नारायण सुर्वे यांचे साहित्य माणसाला जगण्याची ताकद देते : ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे

July 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने संगमनेरात शेतकऱ्यांचा दीड तासांचा महामार्ग रोको मागे शासकीय बफर स्टॉकमधून युरिया मिळताच आंदोलन स्थगनावर शिक्कामोर्तब; लिंकिंग आणि ढिसाळ नियोजनावरून महायुती सरकारवर कडाडून टीका

By अनंत पांगारकरJuly 21, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : खरीप हंगामाच्या ऐन गर्दीत सातत्याने मागणी करूनही युरिया खत…

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; संगमनेरमध्ये प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

July 21, 2026

आज, मंगळवार २१ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 21, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.