Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मालपाणी बजाज शोरूममधील मारहाण प्रकरण: आरोपींच्या अटकेसाठी संगमनेर प्रशासकीय भवनावर मोर्चा; तीव्र आंदोलनाचा इशारा

June 6, 2026

आज शनिवार, ६ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 6, 2026

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » डॉलरनंतर भारतीय रुपया जागतिक पातळीवर दुसरे मोठे चलन ठरेल – सुनील कडलग
सामाजिक

डॉलरनंतर भारतीय रुपया जागतिक पातळीवर दुसरे मोठे चलन ठरेल – सुनील कडलग

रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी व मेडिकल असोसिएशनचा उपक्रम
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 2, 2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन कार्यशाळा

महाराष्ट्र संवाद न्यूज 

शेवगाव – कोरोना महामारीनंतर रशिया-युक्रेन युद्धाच्या जागतिक पातळीवरील झालेल्या आर्थिक ध्रुवीकरणाचा सकारात्मक परिणाम म्हणून भारतीय रुपया हे चलन जागतिक पातळीवर अमेरिकन डॉलर नंतर आंतरराष्ट्रीय चलन म्हणून पर्याय ठरू पाहत आहे, सद्यस्थितीत जागतिक आर्थिक क्रमवारीत भारताचे असलेले पाचवे स्थान लवकरच आणखीन मजबूत होऊन येत्या काही वर्षांत भारत जागतिक पातळीवर तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल, असा आशावाद एमएफडी सुनील कडलग यांनी व्यक्त केला.

मंगळवारी मेडिकल असोसिएशन आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने चला अर्थसाक्षर होऊया या उपक्रमांतर्गत ‘नवीन युगाचे आर्थिक व्यवस्थापन’ या कार्यशाळेत कडलग बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय लड्डा होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. आशिष लाहोटी, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनोज पाचारणे, केमिस्ट असोसिएशनचे मनोज लांडे, डॉ. मयूर लांडे, डॉ. मनोज पुरनाळे, मनिष पवार, आशिष हाथगाळे आदी उपस्थित होते.

कडलग म्हणाले, आंतरराष्ट्रीय चलन म्हणून नवीन ओळख प्रस्थापित करण्याच्या भारताच्या या प्रयत्नांना यश मिळत आहे. रशियाबरोबर रुपया चलनाचा वापर सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर आणखी १८ देशही लवकरच रुपया चलनाचा वापर करतील. जर हा प्रयत्न यशस्वी झाला तर अमेरिकन डॉलरनंतर ( US Dollars) भारतीय रुपया जागतिक पातळीवर दुसरे मोठे चलन ठरेल. उदयोन्मुख आर्थिक महासत्ता म्हणून भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर महासत्ता म्हणून पुढे आणण्याच्या प्रयत्नांना बळ द्यायचे असेल तर शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना अर्थसाक्षरतेचे धडे द्यावे लागतील.

भारत ही जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्था असल्याचा विश्वास परिपक्व किरकोळ गुंतवणूकदारांनी दाखविल्यानेच म्युच्युअल फंड सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे मासिक चलन मार्च २०२३ मध्ये १४,००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. मार्च २०२४ मध्ये एसआयपी १७ ते १८ हजार कोटींचा टप्पा ओलांडेल. सद्यस्थितीत ४० लाख ४ हजार कोटीचा असलेला म्युच्युअल फंड उद्योग हा येत्या सात ते आठ वर्षात शंभर लाख कोटींचा होईल.

परदेशी गुंतवणूदार भारतीय भांडवल बाजारात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. प्रगल्भ लोकशीही, स्थैर्य व लोकसंखेच्या ६५ टक्के हिस्सा असलेला उपभोक्ता युवा वर्ग ही भारताची बलस्थाने असल्याने हा आशावाद वस्तुस्थितीत बदलेल आणि म्हणूनच जागतीक पातळीवरील अनेक व्यावसायिक ब्रॅन्ड भारतात आपले अस्तित्व असावे यासाठी प्रयत्न करीत आहे.

भारतीय बँकामध्ये १५० लाख कोटी रुपयांच्या बचत ठेवी आहेत. त्या तुलनेत म्युच्युअल फंडांत फक्त २० टक्के रक्कम आहे, मात्र भविष्यात महागाई निर्देशांकाच्या तुलनेत अधिक परतावा देणाऱ्या मुच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीचा कल वाढेल. कमी पैशात मोठा जीवन विमा, आपतत्कालीन वैद्यकीय खर्चाच्या तरतुदींसाठी आरोग्य विमा, वैयक्तिक अपघात विमा व इक्विटीच्या माध्यमातून संपत्ती निर्माणासाठी गुंतवणुकदारांनी तज्ज्ञ आर्थिक सल्लागारांचे मार्गदर्शन घ्यावे असेही कडलग म्हणाले. लड्डा यांनी गुंतवणूकदार आर्थिक साक्षर झाल्यास ते संपत्ती निर्माण करतील असे सांगितले.

डॉ. विकास बेडके, अवधूत केदार, डॉ, गणेश नरवडे, डॉ. निखिल काकडे यांच्या प्रश्नांना कडलग यांनी उत्तरे दिली. सुत्रसंचलन प्रदिप बोरुडे यांनी केले तर आभार भागनाथ काटे यांनी मानले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 749
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 5, 2026

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026

लाखो रुपयांचा चुराडा करून महिनाभरातच उखडला रस्ता; संगमनेर नगरपरिषदेच्या ढिम्म कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप, ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा!

June 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

मालपाणी बजाज शोरूममधील मारहाण प्रकरण: आरोपींच्या अटकेसाठी संगमनेर प्रशासकीय भवनावर मोर्चा; तीव्र आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJune 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील कासारा-दुमाला येथील रहिवासी स्वप्नील रोहिदास सातपुते यांना…

आज शनिवार, ६ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 6, 2026

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 5, 2026

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.