Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वाळू तस्करी जीवावर बेतली… प्रवरा नदीत बुडून दोघांना जलसमाधी; उर्वरित तिघे सुखरूप
अपघात

वाळू तस्करी जीवावर बेतली… प्रवरा नदीत बुडून दोघांना जलसमाधी; उर्वरित तिघे सुखरूप

दुर्दैवी विद्यार्थी अकोल्याचे...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – बेलगाम सुरू असलेली प्रवरा नदी पात्रातील वाळू तस्करी पुन्हा एकदा जीवावर बेतली आहे. प्रवरा नदीपात्रात सोमवारी तीन विद्यार्थी बुडाले. पाण्यात बुडालेल्या तिघांपैकी एकाला वाचविण्यात यश आले तर उर्वरित दोघांचे मृतदेह शोध मोहिमेनंतर नदीपात्रात आढळून आले.

सोमवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला. सुदैवाने आसपास असलेल्या नागरिकांमुळे यातील एकाला वाचविण्यात यश आले. उर्वरित दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. दोघांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. निलेश माधव अस्वले (वय 18 वर्ष, रा. नवलेवाडी, अकोले जि. अहमदनगर) व अमोल उत्तम घाणे (वय 18 वर्षे, रा. धुमाळवाडी, ता. अकोले, जि. अहमदनगर) अशी मृत झालेल्या दोघा विद्यार्थी मित्रांची नावे आहे.

नदीपात्रात वाळू तस्करांनी केलेल्या वाळूच्या बेलगाम उपशामुळे प्रचंड खड्डे पडलेले आहे. नगरपरिषदेने देखील या ठिकाणी फलक लावले असून नदीपात्रात उतरण्यास मज्जाव केला आहे. तरी देखील लोक या सूचनेकडे दुर्लक्ष करत नदीपात्रात उतरत असतात. खड्ड्यांमुळे पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही.

सोमवारी दुपारी निलेश अस्वले, अमोल घाणे व युवराज धुमाळ हे तिघेजण महाविद्यालयीन कामासाठी संगमनेरला आले होते. त्यानंतर हे तिघे घुलेवाडीतील ऋतुराज थोरात व हर्षल भुतांबरे या दोघा मित्रांसह दुपारी प्रवरा नदीवर पोहण्यासाठी आले होते. ते सर्वजण नदीपात्रात उतरल्यानंतर त्यातील निलेश अस्वले व अमोल घाणे हे दोघेही पोहत दूरवर गेले. नदीपात्रातील वाळू तस्करांनी केलेल्या खड्ड्यात ते मधल्या धारेपर्यंत गेल्याने प्रवाहाने क्षणात त्यांना आपल्या कह्यात ओढले. नाका-तोंडात पाणी गेल्याने ते ओरडू लागले. युवराज धुमाळ याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.

प्रवरा नदीपात्रात दोघेजण वाहून गेल्याचे वृत्त शहरात पसरतात नागरिकांनी प्रवरा नदीवर धाव घेतली. होणाऱ्या नागरिकांनी नदीपात्रात त्यांचा शोध घेतला असता बऱ्याच वेळानंतर दोघांचे मृतदेह हाती लागले. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात वाळू तस्कर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,266
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुःखावर दुःखाचा डोंगर! नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या महिलेचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

21/08/2026

संगमनेरच्या डॉक्टरवर राहता पोलिसात गुन्हा दाखल! एकाचा मृत्यू, एक गंभीर

21/08/2026

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

02/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराच्या सुरक्षिततेत आणि सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या विविध विकासकामांचे…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.