महाराष्ट्र संवाद न्यूज
कोल्हापुर – महाराष्ट्रात अचानकपणे औरंग्याच्या इतक्या औलादी कुठून पैदा झाल्या? याच्यामागे कोण आहे, हे सुद्धा आपल्याला शोधावं लागेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेचा आवाहन केलं आहे.
कोल्हापूरमध्ये औरंगजेब, टिपू सुलतानच स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाल्यानंतर दगडफेकीचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांकडून ठिय्या आंदोलन आणि कोल्हापूर बंद करण्यात आलं होतं. आंदोलकांवर पोलिसांनी लाठी चार्ज केल्याने कोल्हापूरमध्ये तणावाचे वातावरण आहे.
फडणवीस म्हणाले, जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था खराब झाली पाहिजे यासाठी या औलादी पैदा झाल्या नाहीत ना? हे तपासाव लागेल. कोल्हापूर मध्ये आता परिस्थिती नियंत्रणाखाली असून पूर्णपणे बंदोबस्त तैनात केलेला आहे त्यामुळे कोणीही कायदा सुव्यवस्था खराब होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले. (सौजन्य म.टा.)

