Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अज्ञात चौघा चोरट्यांनी वाहनचालकाला मारहाण करीत पिकअपसह मुद्देमाल लांबविला; घटनास्थळापासून काही अंतरावर पिकअप बेवारस आढळली
गुन्हेगारी

अज्ञात चौघा चोरट्यांनी वाहनचालकाला मारहाण करीत पिकअपसह मुद्देमाल लांबविला; घटनास्थळापासून काही अंतरावर पिकअप बेवारस आढळली

नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर जवळील घटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/06/2023Updated:12/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – पिकअप चालकाला चौघांनी मारहाण करत पिकअपसह सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्याची घटना नाशिक पुणे महामार्गावरील गुंजाळवाडी शिवारात घडली. दरम्यान काही वेळानंतर पोलीस पथकासह पिकअपचा शोध घेतला असता ती बेवारस स्थितीमध्ये जवळच कासारवाडी मध्ये आढळून आल्याचे समोर आले आहे.

या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्री चोरीची ही घटना घडली. अधिक माहिती अशी, महेश रतीलाल पंचाळ हा वाहन चालक पिकअप घेऊन गुजरातहून नासिक-पुणे मार्गाने कर्नाटकला जात असताना सोमवारी रात्री सव्वा बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान पिकअप घेऊन गुंजाळवाडी शिवारातून उड्डाणपूल पास करून जात असताना लघुशंकेसाठी थांबला होता. याच दरम्यान तेथे आलेल्या चौघांनी त्याला लाथाबूक्क्याने मारहाण करत त्याच्या खिशातील मोबाईल फोन, अडीच हजार रुपयांची रोख रक्कम व वाहनाचे कागदपत्र काढून घेत मशिनरी पार्टने भरलेली पिकअप (क्र. GJ 06 BT 2892) पुण्याच्या दिशेने पळवून नेली.

रस्त्याने जाणाऱ्या बाळासाहेब कानवडे यांनी वाहन चालकाच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर चौकशी केली असता वाहन चालक पंचाळ याने घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यामुळे कानवडे यांनी वाहनचालकाला घेऊन संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घडलेल्या घटनेची माहिती घेत लगेचच रात्रपाळीच्या गस्तीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार आणि पोलीस पथकाने वाहनचालकाला सोबत घेत घटनास्थळ गाठले.

पथकाने चोरट्यांचा आणि पिकअपचा शोध सुरू केला असता घटनास्थळापासून काही अंतरावर कासारवाडी गावच्या शिवारामध्ये पथकाला चोरीस गेलेली पिकअप बेवारस स्थितीमध्ये आढळून आली. पोलीस पथकाच्या सतर्कतेमुळे चोरीस गेलेली पिकअप आणि तिच्यात असलेले सुमारे दोन लाख रुपये किमतीची मशीनरी आणि वाहनाचे कागदपत्र आढळून आले. मात्र चोरट्याने पंचाळ यांच्याकडील अडीच हजाराची रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन पोबारा केला आहे. पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 616
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.