Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उच्चशिक्षित तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला; लव्ह जिहादच्या शक्यतेने संगमनेरात खळबळ
गुन्हेगारी

उच्चशिक्षित तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला; लव्ह जिहादच्या शक्यतेने संगमनेरात खळबळ

बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील दोघांना अटक; डीवायएसपी वाघचौरे, निरीक्षक मथुरे यांची माहिती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/06/2023Updated:17/06/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

पबजी खेळाच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी झालेल्या ओळखीतून संगमनेर शहरालगतच्या कासारवाडी शिवारात तरुणी व नागरिकांच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न असल्याचे घटना समोर आले आहे. शहर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून पोलिसांनी पकडलेले दोन्ही आरोपी बिहार राज्यातील आहेत. या घटनेमागे सध्या सुरू असलेल्या लव्ह जिहाद सारखा प्रकार आहे का या दृष्टीनेही संगमनेर पोलीस तपास करत आहे.

अकरम शहाबुद्दीन शेख व मोहम्मद नेमतुल्ला मोहम्मद कैसर (दोघे रा. अलीनगर, जि. दरभंगा, बिहार) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना शनिवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

संगमनेर विभागाचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे व शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या व बी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीची पब्जी गेम खेळत असताना दोन वर्षांपूर्वी अकरम शहाबुद्दीन शेख याच्यासोबत ओळख झाली होती. तेव्हापासून पीडित तरुणी आणि आरोपी यांच्यामध्ये पबजी, व्हाट्सअपच्या माध्यमातून सातत्याने गप्पा होत असत.

या ओळखीतूनच रविवारी (ता. 11) मोबाईल फोनवर दोघांमध्ये झालेल्या संभाषणातून संगमनेर येथे एकमेकांना भेटण्याचे ठरले होते. त्यानंतर आरोपी अकरम शेख हा त्याचा मित्र मोहम्मद नेमतुल्ला मोहम्मद कैसर याच्यासह शुक्रवारी (ता.१६) संगमनेरमध्ये या तरुणीला भेटण्यासाठी आला होता. बस स्थानकावर आल्यानंतर त्याने या तरुणीला फोन करून आपण आल्याची कल्पना दिली. व तिला भेटण्यासाठी कासारवाडी भागातील मालपाणी रिसॉर्टमध्ये आरोपी थांबला होता. तेथे त्याने पीडित तरुणीला भेटायला बोलावले होते.

सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी अकरम शेख याला भेटण्यासाठी गेले असता त्याने येथे बरेच लोक आहेत आपण थोडे लांब निवांत जाऊन बोलू असे तिला सांगितले. तेथून दोन्ही आरोपी व पीडित तरुणी कासारा दुमाला रोडकडे जात असताना अचानक जवळ आलेल्या अकरम शेख याने तिला “तू माझ्यासोबत माझ्या गावाकडे बिहारला चल तू मला खूप आवडतेस आपण दोघे लग्न करू”असे म्हणाला.

त्यावेळी पीडित तरुणीने त्याला मी मित्र या नात्याने भेटायला आले आहे. मी तुझ्यासोबत येणार नाही, असे म्हणत त्याच्यासोबत बिहारला जाण्यास नकार दिल्याने दोघाजणांनी बळजबरीने तिचा हात पकडून “तुला आमच्या सोबत यावे लागेल नाहीतर तुझ्या घरी येऊन तुझी बदनामी करू अशी धमकी दिली”. तशातच तिला तीस-पस्तीस फुटापर्यंत ओढत नेले. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने आरडाओरडा केला.

तरुणीचा आरडाओरडा ऐकून जवळचे काही लोक तेथे जमा झाले. त्यांनी या मुलीची विचारपूस केले असता तिने घडलेल्या प्रकार त्यांना सांगितला. त्यामुळे मदतीसाठी आलेल्या लोकांनी या दोघांनाही पकडून ठेवत शहर पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले.

तरुणीच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 354(अ), 366, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेने शहरात लव्ह जिहादची चर्चा सुरू होती.

या पार्श्वभूमीवर पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे व निरीक्षक भगवान मथुरे यांनी सांगितले की, सदर गुन्ह्यामध्ये सायबर पोलिसांची मदत घेतली जात असून त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर आणखी स्पष्टता होणार आहे. दरम्यान अटक करण्यात आलेले आरोपी बिहार राज्यातून संगमनेर शहरात कोणाच्या मदतीने, कसे आले, नेमके कोणत्या कारणाकरता आले, त्यांचा येथे येण्यामागचा हेतू काय होता, त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का या सर्व दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,561
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.