Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर-अकोल्यातील 33 जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे; कारवाईकडे लक्ष
गुन्हेगारी

संगमनेर-अकोल्यातील 33 जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे; कारवाईकडे लक्ष

एवढ्या मोठ्या संख्येने उपविभागात कारवाईची ही पहिलीच वेळ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/06/2023Updated:30/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या आणि गत दोन वर्षात पुन्हा गुन्हेगारी करणाऱ्या 33 व्यक्तींना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे प्रस्ताव संगमनेर उपविभागाच्यावतीने पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने प्रस्ताव पाठविण्याची संगमनेर उपविभागातील ही पहिलीच वेळ आहे.

संगमनेर उपविभागात संगमनेर शहर संगमनेर तालुका आश्वी घारगाव अकोले आणि राजुर या सहा पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. या सहा पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे हे प्रस्ताव पाठविले आहेत. या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वारंवार गुन्हे करणाऱ्या व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या गुन्हेगारांची जंत्री उपअधीक्षक वाघचौरे यांनी तयार केली असून या सर्वांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात यावे असे अधीक्षकांना पाठविलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. संगमनेर उपविभागातील गुन्हेगारांची माहिती संकलित केल्यानंतर एकाच आठवड्यात त्यातील 33 जणांवर हद्दपारीची कारवाईची टांगती तलवार आहे.

महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55, कलम 56, कलम 57 अंतर्गत सदरचे प्रस्ताव तयार करण्यात आलेले आहे. यामध्ये कलम 55 अंतर्गत गॅंग तडीपारीचे चार प्रस्ताव असून यात एकोणवीस गुन्हेगारांविरुद्ध, कलम 56 अंतर्गत 13 गुन्हेगारांविरुद्ध तर कलम 57 अंतर्गत एका गुन्हेगाराविरुद्ध कारवाई प्रस्तावित आहे.

पोलीस अधीक्षक ओला यांच्याकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये प्रत्येक गुन्हेगाराने चार किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे केलेले असून त्यांनी केलेले सर्व गुन्हे विचारात घेत हे प्रस्ताव पाठविण्यात आले.

गेल्या आठवडाभरात संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने, अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर या अधिकाऱ्यांच्या व त्यांच्या अधिनस्त असलेल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गुन्हेगारांची माहिती संकलित केली जात असून तीन दिवसात 33 जणांचे हे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे.उ

उपविभागातील गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी उचललेले हे सर्वात मोठे पाऊल समजले जात आहे. भविष्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या अशा गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हे करू नये हा त्यामागील उद्देश असून यामुळे संगमनेर उपविभागात शांतता प्रस्थापित होण्यास तसेच कायदा सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी मदत होणार आहे. यात सर्वाधिक प्रस्ताव संगमनेर शहरातून 19 तर संगमनेर तालुका पोलिसांकडून आठ व्यक्ती विरोधात सादर करण्यात आले आहे. अजूनही प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून ही कारवाई पुढील महिन्यात केली जाणार असल्याचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,437
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.