Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळा जन आक्रोश मोर्चा; जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याच्या कारणावरून 21 पदाधिकाऱ्यांसह दीडशे जणांविरोधात गुन्हा दाखल
आंदोलन

निळा जन आक्रोश मोर्चा; जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याच्या कारणावरून 21 पदाधिकाऱ्यांसह दीडशे जणांविरोधात गुन्हा दाखल

आंदोलकांवरील गुन्ह्याची मालिका सुरूच
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/07/2023Updated:11/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर – जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करत मोर्चा काढल्या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी एकवीस प्रमुख पदाधिकाऱ्यांसह इतर सव्वाशे आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुमारे दीडशे लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने मोर्चेकर्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

राज्यात मागासवर्गीय समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत नांदेड येथील मागासवर्गीय तरुण अक्षय भालेराव याची निर्घून हत्या, मुंबई येथे इंजीनियरिंगचे शिक्षण घेणारी युवती हिना मेश्राम हिच्यावर अत्याचार करून तिच्या झालेल्या हत्याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, या दोघांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी यासह अन्य मागण्यासाठी शनिवारी (8 जुलै) विविध संघटनांच्यावतीने निषेधाच्या घोषणा देत प्रांताधिकारी कार्यालयावर निळा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

या संदर्भात रविवारी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांनी फिर्याद दिली आहे. जिल्हाधिकारी यांनी एका आदेशाद्वारे जिल्ह्याच्या स्थळ सीमेमध्ये चार जुलै ते 17 जुलै दरम्यान महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते. मोर्चेकर्‍यांनी या आदेशाचा भंग केल्याच्या कारणावरून शहर पोलीस ठाण्यात सुमारे दीडशे आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये किशोर सुदामराव चव्हाण (रा. दिल्ली नाका, संगमनेर), आशिष प्रभाकर शेळके (रा. उंबरी बाळापुर, ता. संगमनेर), ॲड. किरण सुधाकर रोहम (रा. पिंपरणे, ता. संगमनेर), प्रवीण देवेंद्र गायकवाड (रा. समनापुर, ता. संगमनेर), राजू यादव खरात (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), बाळासाहेब गोपीनाथ गायकवाड (रा. वडगाव पान, ता. संगमनेर), शशिकांत विनायक दारोळे (रा. ढोलवाडी, बुद्धविहार, संगमनेर), संदीप भाऊ मोकळ (रा. पारेगाव, ता. संगमनेर), रामदास दादू दारोळे (रा. राजवाडा, पुणे रोड, संगमनेर), कैलास राजाराम कासार (रा. देवाचा मळा, संगमनेर), रवी अरुण गिरी (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), पप्पू आकाश अर्जुन गोडगे (रा. इंदिरानगर, संगमनेर), माणिक दाजीबा यादव (रा. जोर्वे, ता. संगमनेर), रामदास सुरळकर (रा. राजापूर, संगमनेर), दीपक रणशेवरे (रा. संगमनेर), संध्या खरे (रा. अकोले नाका, संगमनेर), विजय वाकचौरे (रा. अकोले), मंजाबापू साळवे (रा. जाखुरी ता. संगमनेर), वंचित आघाडीचे अजीज ओहरा (रा. संगमनेर), सुनील रमेश रुपवते (रा. माधव थिएटर जवळ, संगमनेर), किशोर दादू वाघमारे (रा. संगमनेर) या प्रमुख मोर्चेकर्‍यांसह सुमारे शंभर ते सव्वाशे जणांचा समावेश आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 616
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar03/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.