Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या काळात राज्याची हुकूमशाहीकडे वाटचाल; शिवसेना (शिंदे गटाच्या) कार्यकर्त्यांवर त्वरित गुन्हे दाखल करत स्थानिक पोलीस यंत्रणेने सत्ताधाऱ्यांच्या हातातील कठपुतली नसल्याचे दाखवून द्यावे: अमर कतारी
राजकारण

शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या काळात राज्याची हुकूमशाहीकडे वाटचाल; शिवसेना (शिंदे गटाच्या) कार्यकर्त्यांवर त्वरित गुन्हे दाखल करत स्थानिक पोलीस यंत्रणेने सत्ताधाऱ्यांच्या हातातील कठपुतली नसल्याचे दाखवून द्यावे: अमर कतारी

निळा मोर्चा प्रकरणी गुन्हा दाखल केल्याच्या घटनेचा केला निषेध
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर – सध्या सत्तारुढ असलेल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या काळात राज्याची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. लोकशाहीत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन, मोर्चे काढले जातात. मात्र सध्या कायद्याचा गैरवापर करत आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे सत्र या सरकारकडून सुरू असल्याचा आरोप करीत दलित बांधवांनी शनिवारी काढलेल्या मोर्चा प्रकरणी सुमारे दीडशे जणांवर पोलिसांच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्यात आला याचा शिवसेनेचे (ठाकरे) शहरप्रमुख अमरभाऊ कतारी यांनी निषेध केला आहे.

कतारी यांनी म्हटले आहे की, नांदेड येथील अक्षय भालेराव आणि मुंबई येथील हिना मेश्राम यांच्या हत्येच्या निषेधार्थ दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी शहर व तालुक्यातील दलित संघटनांच्या वतीने शनिवारी (8 जुलै) निळ्या मोर्चाचं संगमनेरमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. मोर्चामध्ये दलित बांधवांनी एकत्रित येत निळे वादळ तयार केले होते.

दलित समाजातील नेते कार्यकर्त्यांनी अतिशय शांततेत सदरचा मोर्चा काढला होता शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून मोर्चाची सांगता झाली या गोष्टीचा काही राजकीय लोकांना राग आला व त्यांनी सत्तेचा पोलीस बाळाचा गैरवापर करत सुमारे दीडशे दलित बांधव व नेत्यांवर मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1), 37 (3) कलम 135 नुसार गुन्हे दाखल केले. या प्रकाराचा कतारी व शिवसेना तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी निषेध व्यक्त करत दलित समाजाच्या पाठीशी आपण उभे असल्याचे कतारी यांनी म्हटले आहे.

याच पद्धतीने संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाच्यावतीने काढलेल्या भगवा मोर्चा प्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा राजकीय हेतू पुरस्कार सूडबुद्धीने दाखल करण्यात आल्याचा आरोप करत काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये शिवसेनेच्या (शिंदे गटाच्या) सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता विद्यमान खासदार संजय राऊत यांच्या छायाचित्राला काळे फासत आंदोलन केले होते. या संदर्भात शिवसेनेने (ठाकरे) आक्षेप घेत आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करून देखील अद्यापही आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले नाही.

त्यामुळे भाजप सरकारच्या काळात एकाला एक न्याय व दुसऱ्याला दुसरा न्याय हे धोरण चुकीचे आहे. पोलीस दलाने देखील अशा पद्धतीचा दुजाभाव करणे योग्य नाही. या प्रकाराचा निषेध करत शिवसेना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या) कार्यकर्त्यांवर त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी करत स्थानिक पोलीस यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या हातातील कठपुतली नसल्याचे दाखवून द्यावे, असे देखील कतारी यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 639
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar06/09/20260

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त…

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.