Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दंडकारण्याच्या माध्यमातून एक कोटी वृक्षारोपणाचा संकल्प; दुर्गाताई तांबे
सामाजिक

दंडकारण्याच्या माध्यमातून एक कोटी वृक्षारोपणाचा संकल्प; दुर्गाताई तांबे

श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने वृक्षदिंडी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात विविध भागातील डोंगर, टेकड्या, माळरान हरित झाली आहेत. अभियाना अंतर्गत आतापर्यंत 80 लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले असून यावर्षी ही संख्या एक कोटीवर नेण्याचा संकल्प असल्याची माहिती दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्प प्रमुख संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी दिली.

संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष तांबे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना यावेळी रोपण करण्यासाठी रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिवाजीराव खुळे, विठ्ठलबाबा खुळे, सहकार महर्षी थोरात कारखान्याचे संचालक डॉ. तुषार दिघे, प्राचार्य श्रीकांत माघाडे, प्रकल्प प्रमुख शंकर शिंदे, प्राध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

तांबे म्हणाल्या, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर तालुक्यात दंडकारण्य अभियानाची लोक चळवळ उभे राहिली आहे. वयाच्या 83 व्या वर्षी सहकार महर्षी थोरात यांनी “झाडे लावणारा माणूस” हे पुस्तक वाचले आणि यातून प्रेरणा घेत आपणही झाडे लावली पाहिजेत ही कल्पना त्यांनी सोबतच्या सर्वांना सांगितली आणि तालुक्यात झाडे लावण्यासाठी ते झपाटून कामाला लागले. यातूनच दंडकारण्य अभियानाचा जन्म झाला. या अभियानाचे रूपांतर पुढे लोक चळवळीत झाले आहे.

आपल्या आयुष्यातील वृक्षांचे महत्त्व प्रत्येक भारतीय नागरिकाने समजावून घेण्याची आवश्यकता आहे. जीवन जगण्यासाठी वृक्ष आपल्याला सर्व काही देतात. वृक्ष आहेत म्हणून माणसे, पशु-पक्षी सुरक्षित आहे. त्यामुळे वृक्षांवर प्रेम करताना, झाडे लावा झाडे जगवा हा मंत्रपण पुढे नेण्याची आवश्यकता आहे. दंडकारण्य चळवळ गावा-गावात या माध्यमातून पोहोचेल असे त्या म्हणाल्या.

प्राचार्य माघाडे म्हणाले, दंडकारण्य चळवळ काळाची गरज बनली आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या परिसरात झाडे लावलेच पाहिजेत. त्याचबरोबर येणाऱ्या पिढ्यांना झाडे लावा पृथ्वी वाचवा हा संदेश देण्याची आवश्यकता आहे. सुमारे 80 हजार रुपये किमतीचे चिंच, आंबा, कडुलिंब, साताडा, जांभूळ आदी प्रकारचे रोपे मिळाली असून विद्यार्थ्यांनी ही रोपे आपल्या घराजवळ लावून त्याचे संवर्धन करण्याची व त्याच्या वाढीची नोंद करून ठेवण्याची आवश्यकता आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर थोरात यांनी केले तर आभार अशोक गुंजाळ यांनी मानले.

श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमात विद्यार्थी विद्यार्थिनींनी रंगीबेरंगी तसेच वारकऱ्यांचा पेहराव केला होता. ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘कावळा म्हणतो काव काव, माणसा माणसा झाडे लाव’ अशा घोषणा देत वृक्षदिंडीत सहभाग घेतला. वृक्षदिंडी मारुती मंदिरापाशी पोहोचल्यानंतर तेथे विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात रिंगण धरले. वारकरी परंपरेप्रमाणे फुगडी खेळत, नाचत, गात ग्रामस्थांना झाडे लावण्यासाठी प्रेरित केले. वृक्षारोपणाचा संदेश दिला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 558
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा समृद्ध असणाऱ्या संगमनेर शहरात लवकरच अखिल…

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.