Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्लीत ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान राडा: पोलिसांचा लाठीचार्ज आणि अश्रूधूर, परिसरात कलम १६३ लागू

July 20, 2026

आंदोलकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी; प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका

July 20, 2026

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 20, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहमदनगरच्या राजकीय गुन्हेगारीवर थोरातांचा विधिमंडळात हल्लाबोल; गृहमंत्री फडणीसांकडून मिळाले हे उत्तर…
राजकारण

अहमदनगरच्या राजकीय गुन्हेगारीवर थोरातांचा विधिमंडळात हल्लाबोल; गृहमंत्री फडणीसांकडून मिळाले हे उत्तर…

सरकार गुन्हेगारीला आळा घालणार का
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 18, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या अंकुश चत्तरचे हत्याकांड मंगळवारी विधिमंडळात पोहोचले. आरोपींमध्ये भाजपच्या नगरसेवकासह दहा जणांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगाराचा जात, धर्म आणि पक्ष न पाहता कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळात केली.

अहमदनगर शहरात नुकतेच घडलेले अंकुश चत्तर हत्याकांड काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळात स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केले.

गुन्हेगारीवर हल्लाबोल करताना आमदार थोरात म्हणाले, अहमदनगर शहरातील गुन्हेगारी चिंता वाढवणारी आहे. राज्य तुमचे आहे, गृहमंत्री तुमचे आहे, खासदार सत्ताधारी पक्षाचे आहे, आमदारही सत्ताधारी पक्षाकडे आलेले आहे आणि गुन्हेगारही सत्ताधारी पक्षाचाच आहे. त्यामुळे हे सर्व चिंता वाढविणारे आहे. जनतेला असे वाटते की गुन्हेगारांना सत्तेकडून अभय मिळतेय की काय? असा प्रश्न उपस्थित केला.

गृहमंत्री फडणवीस यांना संबोधून थोरात म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री इथे उपस्थित आहेत. गुन्हेगाराला जात नसते. गुन्हेगाराला धर्म नसतो. गुन्हेगाराला पक्ष सुद्धा नसतो. जो कोणी गुन्हेगार असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. नगरमध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे. याचा कुठेतरी तुम्ही बंदोबस्त केला पाहिजे. सरकार म्हणून एक अस्तित्व असतं. हे दाखवण्याची जबाबदारी आली आहे. लोक भयभीत आहेत. अत्यंत अस्थिर, अशांत वातावरण आहे. या मुद्द्यावर गृह विभागाची चर्चा घडवून आणण्याची अपेक्षा मी करतो.

थोरातांना उत्तर देताना गृहमंत्री फडणवीस म्हणाले की… 

सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांनी जो विषय मांडला आहे, त्याबाबत मी त्यांना अश्वस्थ करतो की, गुन्हेगाराचा जात, धर्म, पक्ष न पाहता त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि या सभागृहात त्याचे निवेदन देखील ठेवले जाईल.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 958
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026

‘दुर्गाताई, आता आत्मपरीक्षणाची गरज; लाभार्थ्यांना बाजूला करा!, ताईंवर चिखलफेक होत असताना काँग्रेसचे २८ नगरसेवक गप्प का? – शिवसेनेचे अमर कतारी यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

दिल्लीत ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान राडा: पोलिसांचा लाठीचार्ज आणि अश्रूधूर, परिसरात कलम १६३ लागू

By अनंत पांगारकरJuly 20, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  नवी दिल्ली: ‘नीट’ (NEET) पेपर लीक प्रकरण आणि वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून…

आंदोलकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी; प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका

July 20, 2026

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 20, 2026

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.