Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मंत्र्यांच्या उत्तराने संतापलेल्या थोरात यांनी जखमेवरच बोट ठेवले; नाशिक-मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडी तातडीने सोडवा
राजकारण

मंत्र्यांच्या उत्तराने संतापलेल्या थोरात यांनी जखमेवरच बोट ठेवले; नाशिक-मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडी तातडीने सोडवा

नासिक-मुंबई वाहतूक कोंडीचा प्रश्न सभागृहात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

आज तुम्ही तिकडे जाऊन बसला नाहीतर तुम्ही माझ्याबरोबर या विषयावर भांडला असतात… मंत्री भुजबळ आणि भुसे यांना थोरात यांनी काढला चिमटा
मंत्र्यांकडून वाहतूक सुरळीत करण्याची ग्वाही…
भविष्यात पायाभूत प्रकल्प निर्माण करत असताना पर्यायी व्यवस्था करण्याच्या अध्यक्षांकडून मंत्र्यांना सूचना.
महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – नाशिक मुंबई रस्ता वाहतूक कोंडीचा सापळा झाला आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या प्रश्नावर मंत्रिमहोदय सांगतात ऑगस्ट 2024 पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, हे अत्यंत असंवेदनशील आणि चुकीचे उत्तर आहे, नाशिक-मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर तातडीने मार्ग काढा, अशा स्पष्ट शब्दात ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात मंत्र्यांना सुनावले.
आमदार रईस शेख यांनी नाशिक-मुंबई रस्त्यावरचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यावर मंत्र्यांच्या उत्तराने संतापलेल्या थोरात यांनी या प्रश्नाचे गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
थोरात म्हणाले, भिवंडी बायपास ते ठाणे या प्रवासामध्ये प्रवाशांना दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगांचा सामना करावा लागतो. मी देखील या रस्त्यावरून प्रवास करतो. जळगाव, धुळे, अहमदनगर आणि विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे याच मार्गावरून मुंबईमध्ये येतात. या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झालेली आहे. छगनराव भुजबळ, दादा भुसे अनिल पाटील हे मंत्रीसुद्धा याच मार्गावरून प्रवास करतात. मला माहित नाही ते प्रवास करताना रस्त्याचा, रेल्वेचा, विमानाचा वापर करतात? मंत्री महोदयांसह छगन भुजबळ सुद्धा माझ्या या मताशी सहमत असते. आज तुम्ही तिकडे जाऊन बसलात नाहीतर तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर या विषयात आरडाओरडा केला असता.

नाशिक मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडी तातडीने सोडवा

नाशिक मुंबई रस्ता वाहतूक कोंडीचा सापळा झाला आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या प्रश्नावर मंत्रिमहोदय सांगतात ऑगस्ट 2024 पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, हे अत्यंत असंवेदनशील आणि… pic.twitter.com/jSTfDDw2eP

— Balasaheb Thorat (@bb_thorat) July 25, 2023

एक दिवस मी सुद्धा दोन किलोमीटर पायी प्रवास या रस्त्याने केला होता. तीन ॲम्बुलन्स मला या दरम्यान वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या दिसल्या. वाहतूक कोंडीचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत सोडवावा लागेल, मंत्रिमहोदय उत्तरात सांगतात की ऑगस्ट 2024 पर्यंत ही वाहतूक कोंडीची समस्या कायम राहील. मंत्री महोदय असे चालणार नाही हा प्रश्न गंभीर आहे. तुम्हाला तातडीने याच्यावर उपाययोजना कराव्या लागतील.
यावर मंत्री दादा भुसे यांनी, मी स्वतः मागील आठवड्यात या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा आढावा घेतला आहे. तिथे ज्या-ज्या उपायोजना कराव्या लागतील त्या उपाययोजना करून आठवडाभरात तुम्हाला तिथे किमान 50 टक्के बदल झालेला दिसेल असे सांगितले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, राज्यात अनेक ठिकाणी पायाभूत प्रकल्पांचे काम सुरू आहे. भविष्यात असे पायाभूत प्रकल्प करत असताना आपण पर्यायी व्यवस्था देखील उपलब्ध करून दिली पाहिजे त्या संदर्भात भविष्यात आपण काळजी घ्यावी अशा सूचना केल्या.
नासिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी देखील या विषयाच्या अनुषंगाने सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.

दुपारपासून संगमनेरवरुन मुंबईला अधिवेशनास उपस्थित रहाण्यासाठी निघालो. नाशिक-मुंबई हायवे वर भिवंडी येथे ३-४ तास ट्रॅफिकमध्ये अडकलो, शेवटी एका मित्राने सल्ला दिला की, कल्याणवरुन लोकल ट्रेनने लवकर पोहोचशील, मग काय भिवंडी बायपासवरुन कल्याणच्या दिशेने प्रवास सुरु झाला, तेथेही ३०… pic.twitter.com/hWyvmMbDFY

— Satyajeet Tambe (@satyajeettambe) July 24, 2023

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 674
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील महिलांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संगमनेर नगर…

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.