Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026

मी आत्महत्या करेन… पानसरेंचा रुसवा आणि विखे-जगतापांचे ‘मास्टर’ नियोजन! अखेर तनपुरे बिनविरोध

June 5, 2026

आज शुक्रवार, ५ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला ठरला; बघा कोणाचे किती असतील आमदार
राजकारण

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला ठरला; बघा कोणाचे किती असतील आमदार

इच्छुकांचे आपल्या नेत्यांकडे लॉबिंग सुरू
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 27, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई – सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या (BJP) वाट्याला 6, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (Shiv Sena) 3 आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) 3 जागा असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारांचा फॉर्म्युला ठरला असला तरी प्रत्येकाच्या ठरलेल्या कोठ्यातून कोणाला संधी द्यायची याचा निर्णय अधिवेशनानंतर होणार आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची चर्चा झाल्यानंतर संभाव्य आमदारांची यादी राज्यपालांना पाठविली जाईल.

तत्कालीन मविआ सरकारच्या कार्यकाळात राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा गाजला होता. महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार होईपर्यंत माजी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी ठाकरे सरकारने दिलेली नावे मंजूर केली नव्हती. यावरुन राजकारणही रंगले होते. उद्धव ठाकरेच नाहीत तर खुद्द शरद पवार यांनी देखील भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली होती.

याच दरम्यान राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयात गेली. मात्र आता नियुक्तीची स्थगिती सुप्रीम कोर्टाने उठवल्याने आता राज्यपाल नियुक्त आमदार होण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे नव्या आमदारात आता महाविकास आघाडीचे नव्हे तर सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे आमदार असतील.

12 जागांवर कोणाची नियुक्ती? 

दरम्यान सुप्रीम कोर्टाने स्थगिती हटवल्यानंतर 12 राज्यपाल नियुक्त आमदारांचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर आता आमदारांच्या नियुक्तीचा फॉर्म्युला देखील ठरला आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून या जागांवर कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता आहे. 2019 च्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या तसंच शिंदे आणि फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत पक्षात आलेल्या लोकांना जास्त संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच विधानपरिषदेची टर्म संपलेलेही अनेक जण संभाव्य आमदारकीसाठी आपल्या नेत्यांकडे लॅाबिंग करत असल्याची माहिती समोर येत आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 978
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
यश / निवड / पुरस्कार

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

By अनंत पांगारकरJune 5, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | पुणे:  जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक आणि नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी…

मी आत्महत्या करेन… पानसरेंचा रुसवा आणि विखे-जगतापांचे ‘मास्टर’ नियोजन! अखेर तनपुरे बिनविरोध

June 5, 2026

आज शुक्रवार, ५ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 5, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.