Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026

मी आत्महत्या करेन… पानसरेंचा रुसवा आणि विखे-जगतापांचे ‘मास्टर’ नियोजन! अखेर तनपुरे बिनविरोध

June 5, 2026

आज शुक्रवार, ५ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ एवढ्या पुरते आमचं सरकार काम करत नाही, आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहोत, आमचे वर्क फ्रॉम होम नाही; उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचा टोला
राजकारण

‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ एवढ्या पुरते आमचं सरकार काम करत नाही, आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहोत, आमचे वर्क फ्रॉम होम नाही; उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचा टोला

मुख्यमंत्री ठाकरेंवर टीकेची संधी सोडेना
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 28, 2023Updated:July 28, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

कृषी सेवकांचे मानधन देखील सहा हजार रुपयांवरून 16 हजार रुपये 

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई – ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ एवढ्या पुरते आमच्या सरकार काम करत नसून आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहोत, आमचे वर्क फ्रॉम होम नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये इर्शाळवाडी येथील घटने संदर्भात माहिती देताना सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

शिंदे म्हणाले, इर्शाळवाडी दरडग्रस्तांची कंटेनरमध्ये व्यवस्था केली आहे. भूखंड बघितला असून त्यांची कायम सोय करण्यात येणार आहे सिडकोद्वारे त्यांना आम्ही घर बांधून देणार आहोत. आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहोत, आमचे वर्क फ्रॉम होम नाही.

तसेच इर्शाळवाडीला दिखाव्यासाठी गेलो नव्हतो. हे सरकार सर्व सामान्यांचे सरकार आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरते सरकार काम करत नाही असे ते म्हणाले.

आत्तापर्यंत शेतकऱ्यांना दहा कोटी रुपयांची मदत केली असून शेतकऱ्यांची मदत वाढवली आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे असून शेतकऱ्यांना आता केंद्राचे मिळून वर्षाला 12000 रुपये मिळतील. तसेच पुरामध्ये ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना दहा हजार रुपयांची मदत दिली जाईल. याबरोबर टपरीवाल्यांना देखील 50 हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. ज्यांचे नुकसान जास्त असेल त्यांना 75 टक्के नुकसान भरपाई देण्यात येईल. तसेच छोटी टपरी असेल तर दहा हजार रुपये मदत देणार असल्याचे ते म्हणाले.

कृषी सेवकांचे मानधन सहा हजारावरून सोळा हजारावर…

अजित पवार सत्तेत आल्यामुळे सरकारला बूस्टर मिळाले आहे. सरकारला वेग आला आहे. हे मान्य करायला पाहिजे महाविकास आघाडीने बंद पाडलेले काम आम्ही सुरू केले आहे. एक रुपयात आपण पिक विमा दिला आहे. शेवटचा शेतकरी यामध्ये येणार असून आत्तापर्यंत दीड कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. कृषी सेवकांचे मानधन देखील सहा हजार रुपयांवरून 16 हजार रुपये करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 397
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
यश / निवड / पुरस्कार

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

By अनंत पांगारकरJune 5, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | पुणे:  जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक आणि नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी…

मी आत्महत्या करेन… पानसरेंचा रुसवा आणि विखे-जगतापांचे ‘मास्टर’ नियोजन! अखेर तनपुरे बिनविरोध

June 5, 2026

आज शुक्रवार, ५ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 5, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.