महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – संभाजी भिडे ह्या विकृत व्यक्तीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अतिशय चुकीचे व बेताल वक्तव्य केले आहे. या अगोदरही महात्मा फुले व अनेक महापुरुषांबद्दल जाणूनबुजून सातत्याने वक्तव्य केले असल्याने भिडेंना तात्काळ अटक करावी अशी मागणी छात्र भारती विद्यार्थी संघटनेने गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
ज्या महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.अश्या राष्ट्रपिताबद्दल हा माणूस बेताल वक्तव्य करत आहे. हा देशाचा अपमान आहे. समाजात अशा वक्तव्याद्वारे चुकीची माहिती पसरविली जात असून असे निंदनीय प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने तात्काळ भिडेंवर अटकेची कारवाई करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
गृहमंत्र्यांकडील मागणीचे यांना दिले निवेदन : संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले असून उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हे निवेदन पाठविण्यात आले आहे.
यावेळी छात्रभारती राज्य कार्यवाह अनिकेत घुले, गणेश जोंधळे, संभाजी ब्रिगेडचे तालुका प्रमुख राम अरगडे आदी यावेळी उपस्थित होते.

