Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखेर विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार; बाळासाहेब थोरात विधिमंडळ पक्षनेतेपदी कायम
राजकारण

अखेर विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार; बाळासाहेब थोरात विधिमंडळ पक्षनेतेपदी कायम

वडेट्टीवार-थोरात विरोधकांचा किल्ला लढवणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/08/2023Updated:01/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई – राज्याचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेरीस विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे निश्चित झाले असून या पदावर विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बाळासाहेब थोरात यांच्याकडे विधीमंडळ पक्ष नेतेपदाची जबाबदारी कायम राहणार आहे. त्यामुळे आता सभागृहात वडेट्टीवार-थोरात विरोधकांचा किल्ला लढवताना दिसतील.

चार वर्षानंतर काँग्रेसला पुन्हा संधी: ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार त्यांचा विरोधी पक्ष नेता आणि विधान परिषदेचेही विरोधी पक्ष नेतेपद त्यांच्याकडेच असे सूत्र ठरलेले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठा गट घेऊन बाहेर पडल्यानंतर सभागृहात सर्वाधिक आमदार काँग्रेसचे आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसकडे जाणार ते निश्चित होते. चार वर्षानंतर काँग्रेसकडे पुन्हा हे पद आले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून या पदावर कोणाची नियुक्ती केली जाते, याचे आडाखे बांधले जात होते.

यांची नावे होती चर्चेत: विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस कडून बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. याशिवाय दुसऱ्या फळीतील नेते सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे यांच्या नावाची देखील चर्चा होती. अखेरीस विरोधी पक्षनेते पदावर विजय वडेट्टीवार यांना संधी देण्यात आली आहे.

तर विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडे कायम राहणार असल्याचे पक्षाकडून कळविण्यात आले आहे. या दोन्ही नावांमधून काँग्रेसने नव्या जुन्यांचा वेळ साधण्याचा प्रयत्न केला आहे.

अध्यक्षांना दिले पत्र: नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना देण्यात आले आहे. विरोधी पक्षनेता आणि विधिमंडळ पक्षनेते पदाची नावे काँग्रेसकडून जाहीर करण्यात आल्याने राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी कोण हा प्रश्न देखील आता संपला आहे.

काँग्रेस पक्षाने आ. विजय वडेट्टीवार यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली आहे. त्याबाबतचे पत्र आज विधानसभाध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांना दिले. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, विजय वडेट्टीवार, @INCMumbai अध्यक्ष वर्षाताई गायकवाड उपस्थित होते.
आ. विजय… pic.twitter.com/jMDCv9KyKO

— Balasaheb Thorat (@bb_thorat) August 1, 2023

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 818
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील महिलांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संगमनेर नगर…

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.