Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » युवा पिढी आणि महसूल विभागात योग्य सुसंवाद आवश्यक : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
शिक्षण

युवा पिढी आणि महसूल विभागात योग्य सुसंवाद आवश्यक : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

संगमनेर महाविद्यालयात झाला कार्यक्रम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – महसूल प्रशासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, त्यासाठीचे अर्ज व विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे विविध दाखले आता ऑनलाइन स्वरुपात उपलब्ध आहेत. या सर्व योजना समाजासोबत युवकांपर्यंत अधिकाधिक प्रमाणात पोहोचण्यासाठी युवा पिढी व महसूल विभाग यांच्यात सुसंवाद असला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.

जिल्हाधिकारी कोठे बोलले : महसूल विभागाच्यावतीने राज्यात १ ऑगस्ट ते ८ऑगस्ट दरम्यान सप्ताहाचे आयोजन शासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या सप्ताह अंतर्गत संगमनेर महाविद्यालयात आयोजित ‘युवा संवाद’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते.

यांची होती उपस्थिती : शिर्डीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, नायब तहसीलदार संदीप भांगरे, शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अनिल राठी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा व डॉ. रवींद्र तासीलदार आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी साधला मुक्त संवाद : महसूल प्रशासनाची रचना आणि योजनांची माहिती देत शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यात महसूल प्रशासन अग्रस्थानी असल्याचे सांगितले. महसूल प्रशासनासोबत नागरिकांचा जन्मापासून मृत्यूच्या नोंदणीपर्यंत विविध पातळीवर संबंध येत असतो. आता त्यासाठीचे विविध प्रकारचे अर्ज ऑनलाईन उपलब्ध आहेत.

ऑनलाइन पद्धतीने चालणाऱ्या कामकाजाची युवकांनी माहिती घ्यावी. काळानुरूप होणाऱ्या बदलांचा लेखाजोखा समजून घ्यावा. निवडणूक आयोगाद्वारे युवकांसाठी ऑनलाईन मतदार नोंदणी सुरू आहे. यासाठीच्या ॲपद्वारे पात्र विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी करावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा निपटारा करण्याचा आदेश : यावेळी विद्यार्थ्यांनी देखील शिष्यवृत्ती, पीकविमा, महाविद्यालयासाठी बस उपलब्धता आदी संदर्भात आपले प्रश्न मांडले. जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांची नोंद घेत त्यांचा निपटारा करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

डॉ. संजय मालपाणी म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणारे संगमनेर महाविद्यालय जिल्ह्यातील पहिले स्वायत्त महाविद्यालय आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्यांचा विचार करून महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीकरिता स्वाभिमान कोष व विद्याधन कलश योजना सुरू केल्या आहे. याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होत आहे. कमवा व शिका योजनेत साडेसहाशे विद्यार्थी काम करून शिक्षण घेत आहेत, ही निश्चित अभिमानाची बाब आहे.

कोविड १९ मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे पालक दगावले त्यांचे पालकत्व महाविद्यालयाने स्वीकारले आहे. महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी खेलो इंडियात जाऊन आले आहेत. खेळात महाविद्यालयीन विद्यार्थी निश्चितच नेत्रदीपक कामगिरी करत असून हे याचे सुंदर उदाहरण आहे. खेळाचे महत्व लक्षात घेत अद्यावत जिम्नेशियम तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तळागाळातील विद्यार्थ्यापर्यंत ज्ञानगंगा पोहोचविण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सीईओ रुपेश वालझाडे, कुलसचिव संतोष फापाळे, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, नायब तहसीलदार राजेश पोळ, महाविद्यालय मतदान अधिकारी डॉ. श्रीनिवास भोंग यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 496
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

By Annant Ppangarkar29/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष…

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.