Author: अनंत पांगारकर
शुक्रवार २० डिसेंबर संगमनेर – अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांची निवड आणि योजनेची अंमलबजावणी यासंदर्भात प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटत आहे. या योजनेचा लाभ गरीब झोपडपट्टी धारक, अल्पभूधारक, छोटे व्यवसाय, टपरीधारक, हातगाडीवर व्यवसाय करणारे, विधवा, ज्येष्ठ नागरिकांना व पात्र गरजूंना देण्यात यावा, अशी मागणी करत यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे. गरीब गरजू नागरिक व शिवसेनेच्यावतीने गुरुवारी (१९ डिसेंबर) प्रांताधिकार्यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. गरजूंना या योजनेचा लाभ मिळत नसून सध्या दिवसेंदिवस वाढणारी महागाई आणि बेरोजगारी यामुळे अंत्योदय योजनेतून अनेक गरीब कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो, मात्र या योजनेचा लाभ गरजूं ऐवजी नोकरदार…
शुक्रवार २० डिसेंबर संगमनेर – एकीकडे दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, वाढत असलेली महागाई, शेतमालाचे वाढते भाव आणि दुसरीकडे सातत्याने पाडले जात असलेले शेतीमालाचे भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतीमालाचे भाव सरकारकडून विचार करूनच पाडले जाताय की काय? असा प्रश्न आता प्रत्यक्ष शेतकऱ्यालाच पडू लागलेला आहे. यावरून आता शिवसेना उद्धव ठाकरे आक्रमक झाली असून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न शेतकरी शिवसैनिक पंकज पडवळ यांनी उपस्थित केला आहे. पडवळ म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून आम्ही संगमनेर, अकोले व श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी सातत्याने दूध दरावर आंदोलन करत आहोत. परंतु यावरही तात्पुरती मलमपट्टी करून सरकार शेतकऱ्यांचीच गळचेपी करण्याची भूमिका सातत्याने घेत…
शुक्रवार २० डिसेंबर नागपूर – राज्यातील शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकाला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरु असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही, राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा देय हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल, अशी ग्वाही देत महाराष्ट्र कालही नंबर एक होता, आजही नंबर एक आहे आणि उद्याही नंबर एकच राहील, महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिमानाने व आत्मविश्वासाने विधानसभेत स्पष्ट केले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात १ जुलै…
शुक्रवार २० डिसेंबर अहिल्यानगर – जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी जाणवत असून तापमान वारंवार १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरत आहे. आगामी काळातही थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाहूराज मोरे यांनी केले आहे. थंडीच्या लाटेबाबत स्थानिक हवामान अंदाज रेडिओ, टीव्ही व वर्तमानपत्रांद्वारे नियमित तपासावा. नागरिकांनी स्वेटर, मफलर, कानटोपी, हातमोजे, पायमोजे तसेच चादर यांसारखे पुरेसे उबदार कपडे वापरावेत. शक्यतो थंड वाऱ्यात बाहेर जाणे टाळावे व शरीर कोरडे ठेवावे. शरीर ओले झाल्यास त्वरीत कपडे बदलून शरीरातील उष्णता टिकवावी. निरोगी अन्न, विशेषतः…
गुरुवार १९ डिसेंबर संगमनेर – विधानसभा निवडणूक होऊन बराच काळ झाला आहे, तरीदेखील विरोधकांकडून सातत्याने ईव्हीएमच्या संदर्भात खोटा प्रचार सुरू असून खोट्या बातम्या, खोटे फोटो, व्हिडिओ असे प्रसारित केले जात आहे. अशा प्रकारे खोटे वृत्त प्रसारित करणाऱ्या विरोधात निवडणूक आयोगाने गुन्हे दाखल करण्याची मागणी संगमनेरच्या भारतीय जनता पक्षाने केली असल्याची माहिती दिनेश सोमाणी यांनी दिली आहे. यांना दिले निवेदन – विरोधकांकडून केली जात असलेले कृती लोकशाहीच्या विरोधात असून या संदर्भातील मागणीचे निवेदन संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना देण्यात आले आहे. यासाठी केली मागणी – भारतीय कायद्यानुसार लोकांमध्ये गैरसमज पसरवणे, अफवा पसरवणे, संभ्रम पसरवणे गुन्हा आहे. हे माहिती असून सुद्धा जर…
गुरुवार १९ डिसेंबर मुंबई – संगमनेरच्या अतिक्रमणित झोपडपट्टी व भाड्याच्या घरात राहणाऱ्या संगमनेरकरांसाठी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत मोठी मागणी केली आहे. पंतप्रधान योजनेतून दिल्या जाणाऱ्या घरकुलासंदर्भात त्यांनी सभागृहात आवाज उठविला आहे. या योजनेअंतर्गत राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून दिला जाणारा निधी हा अपुरा असून यात वाढ करण्याची मागणी तांबे यांनी केली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाचा धागा पकडत आपल्या सभागृहातील भाषणात शासनाचे लक्ष वेधताना तांबे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी राज्य शासनातर्फे एक लाख रुपये व केंद्र शासनातर्फे एक लाख रुपये असे दोन लाखाची मदत शहरी भागासाठी दिली जाते. संगमनेर शहरात अडीच हजारावर कुटुंब अशी आहेत की जी भाड्याच्या घरात…
गुरुवार, १९ डिसेंबर मुंबई – लोकसभा निवडणुकीत अवघ्या ४८ मतांनी पराभूत झालेल्या शिवसेना गटाचे (ठाकरे गट) नेते अमोल कीर्तीकर यांची निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. कीर्तीकर यांनी मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातील शिवसेनेचे शिंदे गट नेते रवींद्र वायकर यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान दिले होते. कीर्तीकर यांचा वायकर यांच्याकडून ४८ मतांनी पराभव झाला होता. वायकर यांना ४,५२,६४४, तर कीर्तीकर यांना ४,५२,५९६ मते मिळाली होती. मतमोजणीच्या दिवशीच तफावत आढळून आल्याने पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज दाखल केला होता, असा दावा करून उत्तर-पश्चिम मतदारसंघातील खासदार म्हणून वायकरांची निवड रद्दबातल करावी, तसेच, आपल्याला निर्वाचित उमेदवार म्हणून घोषित करण्याची मागणी कीर्तीकर यांनी या निवडणूक याचिकेतून केली…
गुरुवार १९ डिसेंबर मुंबई – अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या राज्य, जिल्हा आणि ब्लॉकस्तरीय सर्व समित्या तत्काळ प्रभावाने विसर्जित करण्यात आल्या आहेत. संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यातील महिला काँग्रेसच्या सदस्यत्व मोहिमेला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदी संध्या सव्वालाखे या कायम राहून नवीन समित्या स्थापन करण्याच्या प्रक्रियेचे नेतृत्व करणार आहेत. राज्यातील महिला काँग्रेसची सदस्य मोहीम पुढे नेण्यासाठी आणि नारी न्याय सभासदत्व सत्कार समारंभ आयोजित करणे आणि महाराष्ट्रातील महिला काँग्रेस संघटनेच्या उभारणीसाठी संध्या सव्वालाखे यांच्या सोबत खालील विधानसभा क्षेत्रातील महिला पदाधिकारी सहकार्य करणार आहेत. १) दिपाली लालाजी…
गुरुवार १९ डिसेंबर मुंबई – विधान परिषदेच्या सभापतीपदी अपेक्षेप्रमाणे महायुतीकडून भाजपचे प्रा. राम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिंदे यांच्या निवडीचे औपचारिक घोषणा केली. शिंदे यांच्या रूपाने अहिल्यानगर जिल्ह्याला दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे तसेच विरोधकांचे आभार मानले. विधान परिषदेच्या सभापती निवडणुकीसाठी राम शिंदे यांनीच एकमेव अर्ज दाखल केला होता, त्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात होती. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांची ७ जुलै, २०२२ रोजी मुदत संपली होती. तेव्हापासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त होते. राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी…
बुधवार १८ डिसेंबर मुंबई – गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटा आयलंडकडे जात असलेल्या बोटीच्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये १० प्रवाशी आणि तीन नेव्ही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या अपघातात दोन गंभीर जखमींवर नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची चौकशी आता मुंबई पोलिस आणि नौदलाकडून करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, सध्याची आकडेवारी संध्याकाळी साडेसात पर्यंत उपलब्ध होती आणि अंतिम आकडेवारी गुरुवारी सकाळी जाहीर केली जाईल. यावेळी फडणवीस यांनी यावर सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून, मुंबई पोलिस आणि नौदलाकडून या प्रकरणाची तपासणी करण्यात येणार आहे. “अद्याप काही…
