Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पडलेल्या शेतमालाच्या भावावरून उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आक्रमक, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का… शेतकरी शिवसैनिक पंकज पडवळ यांचा सवाल
शेती व सहकार

पडलेल्या शेतमालाच्या भावावरून उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आक्रमक, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का… शेतकरी शिवसैनिक पंकज पडवळ यांचा सवाल

राज्यात अधिवेशन सुरू आहे परंतु जे आमदार-खासदार शेतकऱ्यांच्या मतावरती निवडून येताना आम्ही शेतकऱ्यांचेच पुत्र आहोत अशी अगदी शेतकऱ्यांकडे भीक मागताना दिसतात परंतु नेहमीप्रमाणेच आताही त्यांना शेतमालाच्या भावाचा विसरच पडला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/12/2024Updated:22/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार २० डिसेंबर 

संगमनेर – एकीकडे दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, वाढत असलेली महागाई, शेतमालाचे वाढते भाव आणि दुसरीकडे सातत्याने पाडले जात असलेले शेतीमालाचे भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतीमालाचे भाव सरकारकडून विचार करूनच पाडले जाताय की काय? असा प्रश्न आता प्रत्यक्ष शेतकऱ्यालाच पडू लागलेला आहे. यावरून आता शिवसेना उद्धव ठाकरे आक्रमक झाली असून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न शेतकरी शिवसैनिक पंकज पडवळ यांनी उपस्थित केला आहे.

पडवळ म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून आम्ही संगमनेर, अकोले व श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी सातत्याने दूध दरावर आंदोलन करत आहोत. परंतु यावरही तात्पुरती मलमपट्टी करून सरकार शेतकऱ्यांचीच गळचेपी करण्याची भूमिका सातत्याने घेत आहे. दूध, कांदा व सोयाबीनसह अन्य पिकांची सध्या वाईट अवस्था बघायला मिळते. शेतकऱ्यांचा कांदा आता कुठेतरी हाताशी आला होता. बैल पोळ्याच्या सणादरम्यान जो पाऊस झाला त्यात शेतकऱ्यांकडे फ्लावर वाटाणा अशी पिकं सडून गेली. इकडून तिकडून लाल कांदा आता कुठेतरी शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळवु लागला होता त्यावरही सरकारची वक्रदृष्टी पडली व शेतकरी कसा देशोधडीला लागेल याच्या दृष्टीनेच सरकारने कांद्याचे भाव जाणीवपूर्वक पाडले.

प्रत्यक्षात लाडक्या मुख्यमंत्र्यांनी निवडून येण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात दिलेले होते. उलट ते आश्वासन न पाळता सत्तेवर बसल्यानंतर कांद्याचे भाव मात्र जरूर पाडले गेले. नक्की मायबाप सरकारला शेतकऱ्यांबद्दल काय भूमिका घ्यायची आहे तेच शेतकऱ्यांना कळायला मार्ग नाही. किती दिवस आंदोलन करायचे, कशा प्रकारचे आंदोलन करायचे, किती दिवस सरकारला विनंती करायची याबद्दल कळायला जागा नाही. शेतकरी सगळीकडूनच कचाट्यात सापडला जातोय आधी निसर्ग मग सरकार. “आई घरात खाऊ घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही” मग शेतकऱ्यांनी नक्की जगायचं तरी कसं हा प्रश्न त्यांच्यापुढे सातत्याने उभा राहतोय.

खरंतर शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं परंतु हाच राजा आज एका वेळच्या जेवणाला ही महाग होतो की काय अशी परिस्थिती तयार व्हायला लागली आहे. लाडक्या बहिणींमुळे शेतावरती मजूर मिळत नाही. दुधाचे दर कमी असल्यामुळे जोडधंदा असलेला हा व्यवसाय तोट्यात जात आहे. शेतकरी एवढा मेटाकुटीस आलेला आहे की सर्वसामान्य शेतकरी मुलांचे लग्न जमलं सुद्धा मुश्किल होऊन बसले आहे. गावोगाव अनेक तरुण बिनलग्नाचे फिरतायेत. या तरुणांचे नक्की भवितव्य तरी काय असणार आहे? राज्यात अधिवेशन सुरू आहे परंतु जे आमदार-खासदार शेतकऱ्यांच्या मतावरती निवडून येताना आम्ही शेतकऱ्यांचेच पुत्र आहोत अशी अगदी शेतकऱ्यांकडे भीक मागताना दिसतात परंतु नेहमीप्रमाणेच आताही त्यांना शेतमालाच्या भावाचा विसरच पडला आहे.

शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा प्रश्न नाहीये, अशा भावनेने ते सभागृहात वावरत आहे एकंदरीत शेतकऱ्यांबद्दल कोणीच बोलायला तयार होताना दिसत नाहीये. या मायबाप सरकारला एवढीच विनंती आहे, आमची कळवळ समजून घ्या आणि शेतमालाचे भाव वाढवा व तुम्ही दिलेले संपूर्ण शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पाळा.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 12,777
पंकज पडवळ शेतीमाल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar20/09/20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साह आणि नवीन ऊर्जा घेऊन आला आहे. कार्यक्षेत्रात…

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.