Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ४८ मतांनी पराभूत झालेल्या ठाकरेंच्या नेत्याची निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, यांची खासदारकी कायम राहणार!
न्यायालय

४८ मतांनी पराभूत झालेल्या ठाकरेंच्या नेत्याची निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, यांची खासदारकी कायम राहणार!

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/12/2024Updated:19/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, १९ डिसेंबर 

मुंबई – लोकसभा निवडणुकीत अवघ्या ४८ मतांनी पराभूत झालेल्या शिवसेना गटाचे (ठाकरे गट) नेते अमोल कीर्तीकर यांची निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली.

कीर्तीकर यांनी मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातील शिवसेनेचे शिंदे गट नेते रवींद्र वायकर यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान दिले होते. कीर्तीकर यांचा वायकर यांच्याकडून ४८ मतांनी पराभव झाला होता. वायकर यांना ४,५२,६४४, तर कीर्तीकर यांना ४,५२,५९६ मते मिळाली होती. मतमोजणीच्या दिवशीच तफावत आढळून आल्याने पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज दाखल केला होता, असा दावा करून उत्तर-पश्चिम मतदारसंघातील खासदार म्हणून वायकरांची निवड रद्दबातल करावी, तसेच, आपल्याला निर्वाचित उमेदवार म्हणून घोषित करण्याची मागणी कीर्तीकर यांनी या निवडणूक याचिकेतून केली होती.

काय होता कीर्तीकर यांचा आक्षेप – मतदान केंद्रावर मतमोजणी दरम्यान १२० टेंडर मते गहाळ झाली. त्यांची मोजणी झालेली नाही. एकूण ३३३ टेंडर मते होती. त्यापैकी १२० टेंडर मते मोजली गेली नाहीत. टेंडर मतांच्या फेरमोजणीची विनंती केली होती, पण ती नाकारण्यात आल्याचा दावा, कीर्तीकर यांच्यातर्फे युक्तिवादाच्या वेळी करण्यात आला होता. मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून अनेक गंभीर चुका झाल्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाला. तसेच, मतमोजणी केंद्रात भ्रमणध्वनीचा वापर झाल्याचे दिसून आले. हा मुद्दा वारंवार निदर्शनास आणून देऊन, तसेच गुन्हा नोंदवल्याच्या बाराव्या दिवसापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे, टेंडर मते ही या मतदारसंघाच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतील वादाचे मुख्य कारण असल्याचा दावाही कीर्तीकर यांच्यातर्फे करण्यात आला होता.

वायकर यांच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद – कीर्तीकर यांची याचिका ऐकण्यायोग्य नाही. याचिकेची मांडणी योग्यरित्या करण्यात आलेली नाही. तसेच टेंडर मते ही विजयी उमेदवाराला कशी मिळाली हे दाखविण्यास कीर्तीकर अपयशी ठरले आहेत. त्यामुळे, त्यांची याचिका फेटाळून लावावी हा वायकर यांच्यावतीने करण्यात करण्यात आलेला दावा न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने योग्य ठरवला. तसेच, कीर्तीकर यांची याचिका फेटाळली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 10,618
मुंबई उच्च न्यायालय याचिका फेटाळली
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

By Annant Ppangarkar09/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने एमडी ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात…

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.